सतर्कतेचा इशारा ; देशात करोना पुन्हा वाढतोय,महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना टेन्शन
गेल्या दोन लाटेनंतर अजून जनता आता कुठेतरी सावरत असतानाचा देशभरात पुन्हा एकदा करोनाच्या रुग्णांच्या सातत्याने वाढीची आकडेवारी नागरिकांमध्येही चिंता वाढली आहे. ताज्या आकडेवारीनुसार,मागील दोन आठवड्यात हा आकडा ३.५ टक्के वाढला
मागील वर्षी जानेवारी आणि मार्च दरम्यान भारतात करोना महामारीची तिसरी लाट आली होती. यावेळी करोना रुग्णांमध्ये लक्षणही सामान्य दिसत होते. तसंच, रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही कमी होते.सध्या दिल्लीत रुग्णवाढीचा पॉझिटिव्हिटी रेट अधिक आहे.जास्त पॉझिटिव्ही रेट असलेले जिल्ह्यांच्या यादीत, केरळच्या वायनाडमध्ये १४.८ टक्के, कोट्टायममध्ये १०.५ टक्के, गुजरातच्या अहमदाबादमध्ये १०.७ यांचा समावेश आहे. तर, यामध्ये महाराष्ट्रातील सांगली १४.६ टक्के आणि पुणे ११.१ टक्के इतका पॉझिटिव्हिटी रेट नोंद केला आहे.
XBB.1.16 हा विषाणूचा एक नवीन प्रकार आहे.
जो BA.2.10.1 आणि BA 2.75 या उपप्रकारांच्या संयोगातून विकसित झाला आहे. आतापर्यंत 14-15 देशांमध्ये त्याची प्रकरणे आढळून आली आहेत. माजी ICMR शास्त्रज्ञ डॉ ललित कांत म्हणाले, भारतात आतापर्यंत नोंद झालेले रुग्णांची लक्षणे सौम्य आणि गंभीर नाहीत. रूग्णांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही. त्यामुळं घाबरण्याची गरज नाही. मात्र, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.