राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची रांगोळीत साकारले छायाचित्र | जतच्या समृद्धी मोरेंची अनोखी भेट

0जत,संकेत टाइम्स : जत शहरातील विठ्ठलनगर येथे राहणारी समृद्धी धिरज मोरे बारावीत शिक्षण घेत आहे.या मुलीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बावीसाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे रांगोळीने छायाचित्रे रेखाटुन अनोखी भेट दिली आहे.याचे जत शहरातुन कौतुक होत आहे.


वयाच्या 80 वर्षे पुर्ण केलेले देशाचे ताकतवान नेते शरद पवार यांची अखंड महाराष्ट्रात एक वेगळी ओळख आहे.दुसरीकडे तरुणाईलाही शरद पवार यांची भुरळ आहे.समृधी मोरे हिला लहान पणापासून चित्रकला,रांगोळी रेखाटण्याची आवड आहे.तिने आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदी महान व्यक्तींची रांगोळीने छायाचित्र रेखाटली आहेत. नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचा 22 वा दिन साजरा करण्यात आला.वर्धापन दिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे रांगोळीने रेखाचित्र रेखाटण्याचा संकल्प केला. Rate Cardसमृद्धी हिने तीन बाय पाच एवढ्या आकाराचे छायाचित्र रेखाटले. यासाठी पाच किलो रांगोळी लागली.तर छायाचित्र रेखाटण्यासाठी तीन तास वेळ लागला.यासाठी तिला आई वडील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हे छायाचित्र पाहण्यासाठी जतकरानी गर्दी केली आहे.जतच्या समृध्दी मोरे हिने रेखाटलेले शरद पवार यांचे छायाचित्र

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.