महिलांना मिळणार शासनाकडून मोफत पिठाची गिरण,अधिक माहिती, अर्ज कुठे करायचा यासाठी येथे क्लिक करा

0

शासन महिला मदत करत असतयं,आताही महिलांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत.आता गरजू महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी दिली जाणार आहे. शंभर टक्के अनुदान यावरती ही पिठाची गिरणी सरकारकडून देण्यात येणार आहे.त्यासाठी अर्ज भरणे सुद्धा चालू झालेले आहेत.या योजनेचा उद्देश्य फक्त खेड्यातील महिलांना चांगला रोजगार उपलब्ध करून देणे आणि महिलांना घरी बसून चांगले उत्पन्न घेता येईल.कारण की पिठाची गिरणी पासून उत्पन्न हे चांगले मिळते. आणि हा व्यवसाय महिला सहज करू शकतात.

 

महिलांसाठी शंभर टक्के अनुदानावर पिठाची चक्की या योजनेतून मिळणार आहे. योजनेचा लाभ फक्त महिलांच घेऊ शकणार आहेत.ग्रामीण भागातील गरजू आणि गरीब महिलांसाठी ही योजना राबवली जात आहे.ज्या महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत.अशा महिलांना या योजनेतून लाभ देऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सक्षम करणे असा या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे.

 

मोफत पिठाची गिरणी योजनेचे नियम व पात्रता

1) या योजनेत फक्त महिलांनाच लाभ मिळू शकतो.

2) आर्थिक दुर्बल गरीब आणि गरजू महिला या योजनेसाठी पात्र ठरतात.

3) १८ ते ६० वयोगटातील मुली व महिलां लाभ घेऊ शकतात.

4) अर्ज करणारी महिला किंवा मुलगी किमान बारावी शिक्षण झालेली असावी.

5) लाभ घेणाऱ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे १ लाख २० हजारांपेक्षा कमी असावे.

अशा पात्रता असणाऱ्या सर्व महिला किंवा मुली योजनेचा लाभ घेऊ शकतात.

 

 

ही कागदपत्रे द्यावी वागतील

1) विहित अर्जाचा नमुना

2)शिक्षणासंबंधीत शालेय प्रमाणपत्र

3) व्यवसायासाठी पिठाची गिरण चाल  शकणाऱ्या जागेचा उतारा

3) उत्पन्नाचा दाखला( तहसीलदार किंवा तलाठी यांचा)

4) आधार कार्ड झेरॉक्स प्रतं

5)बँक पासबुकच्या प्रथम पानाची झेरॉक्स

6) गावात रहिवासी असल्याबाबत दाखला

7)आपल्या घराचे विज बिल

 

 

या योजनेचा अर्ज कसा व कोठे करावा ते पाहूया.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज  ऑफलाईन भरावयाचा आहे.विहित नमुना हा पूर्णपणे भरून घ्यायचा आहे.आणि त्याच्यासोबत सांगितलेली वरील कागदपत्रे जोडायचे आहेत.

 

हा अर्ज भरून झाल्याच्या नंतर आणि कागदपत्रे जोडल्यानंतर तुम्हाला तुमच्या तालुक्यातील गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालयात जमा करायचा आहे. आणि हा अर्ज जमा केल्यानंतर पात्र लाभार्थ्याची निवड महिला व बालविकास समिती द्वारा केली जाईल.आणि लाभ मंजूर झाल्याचे लाभार्थ्यांना पत्राद्वारे कळविण्यात येईल.तर अशाप्रकारे महिला या योजनेचा लाभ घेणे शक्य आहे.अधिक माहितीसाठी नजिकच्या पंचायत समितीला भेट द्यावी.

 

सुचना : वरिल माहिती इंटरनेटवरून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही कोणताही दावा करत नाही.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.