द्राक्ष व्यापाऱ्याकडील १ कोटी ९ लाख लुटले,पोलीसांनी ८ तासात चोरट्यांना पकडले

0
द्राक्ष व्यापारी चोरीचा एलसीबीच्या पथकाने अवघ्या ८ तासातच या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या.१ कोटी ९ लाख रूपये जप्त केले आहेत.सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे द्राक्ष व्यापाऱ्याकडील तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांची लुट करणाऱ्या तिघाजणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ८ तासात जेरबंद केले आहे.त्यांच्याकडून तब्बल १ कोटी ९ लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.अवघ्या काही तासात पोलिसांनी लुटीचा छडा लावल्याने कामगिरीचे कौतुक होत आहे.

 

भर रस्त्यात‌ दुचाकीवरील असा ‘व्हिडिओ’ पाहून नेटकऱ्याकडून आल्या अशा प्रतिक्रिया 

Rate Card
नितीन खंडू यलमार (वय २२), विकास मारूती पाटील (३२) आणि अजित राजेंद्र पाटील (२२, सर्व रा. मतकुणकी ता.तासगाव) यांना याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथील द्राक्ष व्यापारी महेश शितलदार केवलाणी यांनी तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.मंगळवार ता.३० रोजी सायंकाळी सातच्या सुमारास तासगाव येथील गणेश कॉलनी परिसरात ही घटना घडली होती. महेश केवलाणी हे तासगावसह तालुक्यातील अन्य गावात द्राक्षे खरेदी करतात.मंगळवारी ते अगोदर विकलेल्या मालाची सांगलीतून १ कोटी १० लाख रुपयांची रोकड घेऊन ते तासगावमध्ये आले होते.

 

 राज्य उत्पादन शुक्ल विभागात जवान,नि-वाहनचालक,पदाची भर्ती | काय आहेत नविन नियम,परिक्षेचे स्वरूप,शारीरिक पात्रता | जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

याचदरम्यान संशयितांनी दुचाकी आडवी मारून केवलाणी यांची मोटार अडवत त्यांना तलवारीचा धाक दाखवून,केवलाणी यांचे दिवाणजीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत पैशाची बॅग घेऊन ते पसार झाले होते.
दिवसाच इतकी मोठी रक्कम लुटण्यात आल्याने पोलिसांनी घटनचे गांभिर्य ओळखून गतीने तपास सुरू केला.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून तपास सुरू असताना, ही लुट मतकुणकी येथील नितीन यलमार याने केल्याची व तो साथीदारांसह मणेराजूरी येथील शिकोबा डोंगराजवळ थांबला असल्याची माहिती पोलीसांना मिळाली.त्या माहितीनुसार पथकाने तिथे छापा मारून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयित तिघांना हत्यारासह ताब्यात घेतले.

 

विजय ताड खून प्रकरणातील संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ

यावेळी त्यांच्याजवळ १ कोटी ९ लाख रुपयांची रोकड, तीस हजार रुपये किंमतीची दुचाकी आणि तलवार असा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला.या घटनेचे गांभीर्य ओळखून स्वत: पोलिस अधीक्षक डॉ. तेली यांनी तपासात लक्ष घातले होते.पोलीसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

देवाण-घेवाणच्या त्रासातून तरूणांची आत्महत्या, एकावर गुन्हा दाखल

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.