आपले कर्म चांगले ठेवा!

0
आपल्या आयुष्यात कर्माला खुप महत्व आहे.ज्याला आयुष्यात पुढे जायचे आहे.त्याने आपले कर्म चांगले ठेवले पाहिजे.आपल्याला हा मनुष्यजन्म मिळाला आहे .तो काही तरी सार्थकी करून दाखविण्यासाठी  आपली  ओळख ही आपल्या कर्मातुनच होत असते.जन्म मृत्यूचा फेरा कुणाला चुकलेला नाही या जन्मात आपण दुसर्यांशी  कसे वागतो ,व आपले आचरण कसे ठेवतो यावरच आपल्या कर्माचे फळ मिळत असते.

   डॉक्टरांना १५ लाखांच्या खंडणीची मागणी,तिघाविरोधात गुन्हा दाखल

जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर म्हणजे मनुष्य जसे कर्म करतो तसेच ईश्वर त्याला फळ देत असतो.चाणक्यनितीमध्ये सांगितले आहे व्यक्ती एखादे चांगले वाईट काम करते. ते कर्म मग त्या व्यक्तीच्या मागेमागेच जाते.आपल्या कर्मापासुन कोणाची सुटका नाही.सत्कर्म आणि दुष्कर्माची फळे  आपल्याला भोगावीच लागतात.म्हणुन मनुष्याने आपले सत्कर्म चांगले करायला हवीत.

    सांगलीत श्रीरामाच्या ५१ फुटी प्रतिमेचे दर्शन

बहुतांश वेळा मनुष्य कोणतेही चांगले कर्म न करता फळांची अपेक्षा धरतात.थोडे कर्म केले तर फळांची अपेक्षा बाळगणारे खुप आहेत.प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःख येणार आहे.अडचणी कोणाला नाहीत.त्यासाठी आपल्या प्रयत्नांवर व आपल्या कर्मावर विश्वास ठेवायला हवा.माणसाचे जीवन हे अनेक चढ उताराचे आहे.कधी चा़गले तर कधी वाईट दिवसांना सामोरं जावं लागतं.हृया जीवनात कोणतीच गोष्ट शाश्वत नाही.आज माणुस खोट्या प्रतिष्ठेच्या मागे धावत आहे.सगळ्यात महत्वाचे आपले आचरण चांगले असले पाहिजे.जी माणसं सत्याच्या मार्गाने चालतात.वागतात त्यांना आयुष्यात कुठेच कमी पडत नाही.

शेतकऱ्यांना विहिरीसाठी लाच मागितली म्हणून सरपंचाने असे काही केले की,व्हिडिओ तूफान व्हायरल

परंतु जो माणुस दुसर्याच्या मार्गावर काटे पेरण्याचा प्रयत्न करतो.दुसर्यांना अडचणीत आणतो त्याला त्याचे कर्मानुसार फळ मिळतेच . चांगल्या कर्माचे फळ म्हणजे सुख,तर वाईट कर्माचे फळ म्हणजे दुःख होय.हा सृष्टीचा नियम आहे.त्यामुळे दुसर्यांची नेहमी चांगले बोला,चांगले वागा , एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी व्हा,कुणाकडुनही कसली अपेक्षा ठेवु नका.आपले कर्म चांगले असल्यास निश्चितच आपल्याला त्याचे फळ मिळणारच .त्यासाठी आयुष्यात चांगले कर्म ठेवा.शेवटी सोबत तेच येणार आहे.
Rate Card
संतोष दत्तू शिंदे
मु.पो‌.काष्टी,ता.श्रीगोंदा.जिल्हा , अहमदनगर
महाराष्ट्र
मो‌.७७२१०४५८४५

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.