तिसरे कन्नड साहित्य संमेलन उत्साहात
संख : जत तालुक्यातील संख येथे कन्नड साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र गडीनाडू कन्नड तिसरे साहित्य संमेलन
झाले.संख येथील श्री गुरुबसू विद्यामंदिर येथे हे संमेलन आयोजित करण्यात आले होते.नागणसूर मठाचे मताधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी,माजी आमदार विलासराव जगताप यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.
स्वागताध्यक्ष डॉ.आर. के. पाटील होते.कर्नाटक राज्याध्यक्ष डॉ. महेश जोशी म्हणाले की, कर्नाटक महाराष्ट्र व कन्नड-मराठी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.आपण सर्व भारतीय आहोत. मातृभाषा कुठलाही असो,त्यांच्यावर मातेप्रमाणे प्रेम करा,असा चांगला विचार देऊन नागरिकांमध्ये संमेलनाद्वारे जनजागृती करण्यात आली.यावेळी विविध कलागुण दाखवणारे कार्यक्रम व अनेक कवी, थोरांचे, संतांचे महात्म्यांचे विचार सांगण्यासाठी कर्नाटकातील कानाकोपऱ्यातून कन्नडवर प्रेम करणारे कलाकार उपस्थित होते.
यावेळी तमन्नगौडा रवी पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी महांतेश माळी,सोमशेखर जमशेट्टी, माध्यमिक शिक्षण सेवक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील, मुख्याध्यापिका सौ. कविता पाटील,मलिकजान शेख, गुरुबसू वाघोली,एम. एस. सिंदूर, उमेश कोट्याळ,अजय बिराजदार आदी उपस्थित होते.