हभप निवृत्ती देशमुख (इंदुरीकर) महाराज तिंसगीतील व्याख्यानात कायम म्हणाले बघा…
आज माणसाना कॅन्सर,ब्रेन ट्युमर,ऑट्याक यासारख्या रोगाला समोर जावे लागत आहे.याला एकमेव कारण म्हणजे आहारातील केमिकल्स फवारणी केलेले भाजीपाला व अतिरिक्त ताणतणाव आसल्याचे मत हभप निवृत्ती देशमुख- महाराज (इंदुरीकर) यांनी व्यक्त केले.ते तिसंगी (ता कवठेमहांकाळ) येथे श्री सिध्दनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात बोलत होते.
बालसंगोपन योजनेत एकल पालकांच्या मुलांना मिळतात दर महिन्याला २२५० रुपये
यावेळी बोलताना इंदुरीकर महाराज पुढे म्हणाले की आज गरीब घरातच मोठ्या प्रमाणात व्यसनाधीनता दिसत असुन हीच खरी चिंतेची बाब असुन.या व्यसनामुळेच मुलाला बापाने खांद्या देण्याची वेळ येते ही मोठी शोकांतिका आसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.तब्बल तीन तास चाललेल्या या कीर्तन सोहळ्याने उपस्थित चांगलेच मंत्रमुग्ध झाले होते.तर आधीमधी चांगलेच हास्याचे फवारे उडत होते.गावालगत असलेल्या मोकळ्या माळावर झालेल्या या कीर्तन सोहळ्याला पंचक्रोशीतील हजारो लोकांनी मोठी गर्दी केली होती.आभार उपसरपंच तानाजीराव कदम यांनी मानले.
शेतकऱ्यांना विहिरीसाठी लाच मागितली म्हणून सरपंचाने असे काही केले की,व्हिडिओ तूफान व्हायरल