जत तालुक्यातील उमराणी येथील पूजा महादेव येळमळी (वय 2८) या विवाहित महिलेचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान घडली. मात्र या घटनेनंतर नातेवाईकांनी सासरच्या मंडळींनी घातपात केल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात ठिय्या मांडला होता. मात्र पोलिसांनी वेळी हस्तक्षेप परत पोस्टमार्टम अहवालानंतर गुन्हा दाखल करू असं सांगितले नंतर रात्री उशिरा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कसा मिळवावा ?
याबाबतची अधिक माहिती अशी की, मिरज येथील पूजा हिचा विवाह जत तालुक्यातील उमराणी येथील महादेव येळमळी या तरुणाबरोबर झाला होता.विवाह होऊन सात -आठ वर्षे झाली आहेत.विवाह नंतर पूजा व महादेव यांना दोन मुली एक मुलगा झाला होता. मात्र मुलाचा मृत्यू झाल्यानंतर पूजा व पती महादेव यांच्यांत वारंवार वाद होत होते.आणखीन एक मुलगा व्हावा,यासाठी वारंवार खटके उडत असे.पूजा ही आपल्या दोन मुली सह आपल्या माहेरी मिरज येथे गेली होती.मात्र जेष्ठ मंडळीनी समजूत काढून पूजाला शुक्रवारी सासरी आणले होते.रविवारी पूजा ही नेहमीप्रमाणे घरातील काम करत होती.जवळच घरचे बांधकाम सुरू आहे.तेथे पाणी मारत असताना पुजाला विजेचा शाॅक बसल्यीने तिचा जागीच मृत्यू झाला.या घटनेनंतर सासरच्या मंडळींनी तातडीने पूजाला जत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते.मात्र तिचा उपचारार्थ येताना मृत्यू झाला.
स्वस्तात मरणाची ‘झिंग’ गल्लोगल्ली पोहचली | लहानगे,प्रौढही आहारी,ग्रामीण भागात धुमाकूळ
या घटनेनंतर पूजाच्या माहेरच्या नातेवाईकांनी पूजाचा सासरच्या मंडळींनी घातपात केल्याचा आरोप करत जोपर्यत गुन्हा दाखल करत नाही.तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेत नाही असा पवित्रा घेतला होता.मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान लवटे यांनी पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर नक्कीच गुन्हा दाखल करू तोपर्यंत मृतदेह ताब्यात घ्या अशी समजूत नातेवाईकांची काढली. त्यानंतर नातेवाईकांनी मृत्तदेह ताब्यात घेतला घेतला.रात्री उशिरा उमराणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले अधिक तपास पोलीस करीत आहेत.
श्रीपती शुगरकडून संपूर्ण ऊसबिल जमा