एकीकडे महाराष्ट्र उन्हाने होरपळत असताना तूफान अवकाळी पाऊस पडल्याने नदीला पूर आला आहे.महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याला अवकाळी पावसाने जोरदार झोडपल्याने
तळोदा तालुक्यातील रापापुर येथील नदीला पूर आला आहे.गेल्या काही दिवसात नंदुरबार जिल्हातील तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला होता.तीव्र उन्हाळ्यातही अवकाळीचा जोरदार पावस झाल्यामुळे जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील रापापुर येथील नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले असून नदी दुथडी भरून वाहत आहे.
पावसामुळे तालुक्यातील लहान मोठे नदी,ओढे, नाल्यांनेही भरून वाहत आहे.चक्क एप्रिल महिन्यातील उन्हाळ्यात नदीला पूर आल्याने नागरिकांनी नदीचे पाणी पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.नदीच्या लाभ क्षेत्रा अवकाळीचा धो-धो पावस कोसळल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.
आज ता.२२ रोजी दुपारपासून नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा,धडगाव,अक्कलकुवा आणि शहादा तालुक्यातील अनेक भागातही जोरदार पावसाने सुरूवात केली आहे असून गारपीट झाली आहे.गारपीठमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हेही वाचा..
• जतच्या भाजपा तालुकाध्यक्षाला उमेदवारी नाकारली,सांगली बाजार समिती निवडणुकीवर बहिष्कार- विलासराव जगताप
• सिंदूर येथे तरुणाची आत्महत्या
• स्वस्तात मरणाची ‘झिंग’ गल्लोगल्ली पोहचली | लहानगे,प्रौढही आहारी,ग्रामीण भागात धुमाकूळ