जतच्या भाजपा तालुकाध्यक्षाला उमेदवारी नाकारली,सांगली बाजार समिती निवडणुकीवर बहिष्कार- विलासराव जगताप

0
जत भाजपच्या तालुकाध्यक्षाला अखेरच्याक्षणी नाव पॅनेलमधून वगळल्याने सांगली बाजार समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे,अशी घोषणा माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली आहे.

स्वस्तात मरणाची ‘झिंग’ गल्लोगल्ली पोहचली | लहानगे,प्रौढही आहारी,ग्रामीण भागात धुमाकूळ

भाजपा पँनेलमध्ये खासदार संजयकाका पाटील यांनी दबाव आणून असे केल्याचा आरोप आ.जगताप यांनी केला.सांगली बाजार समिती संचालक मंडळाच्या १८ जागासाठी निवडणूक होत असून यासाठी तब्बल ९० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गुरुवारी महाविकास आघाडीविरुध्द भाजप असा अशी लढत होणार हे स्पष्ट झाले होते.

विज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, दोन म्हैशीही दगावल्या | पहा ‌कुठे घडली घटना

Rate Card

शुक्रवारी चिन्ह वाटपावेळी पॅनेलमधील उमेदवारांची यादी निवडणूक अधिकाऱ्यांना सादर करीत असताना ऐनवेळी जत तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत यांचे नाव वगळण्यात आले. यामुळे संतापलेले विलासराव जगताप यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकत असल्याची घोषणा करत भाजपा पँनेलची डोकेदुखी वाढवली आहे.दरम्यान महाविकास आघाडीच्या वसंतदादा शेतकरी पॅनेलसाठी हे फायद्याचे होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.