उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जतेत स्वागत

0

जत : कर्नाटकातील विधानसभा निवडणूक प्रचारार्थ विजापूर (कर्नाटक)जिल्ह्यात असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी जत येथून हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना झाले.ते मुंबईकडे जात असताना प्रथमचं जत दौऱ्यावर आले होते.

 

त्याचे जतेत आमदार विक्रमसिंह सावंत यांनी स्वागत केले.दरम्यान अचानक नियोजित नसताना उपमुख्यमंत्री जतेत आल्याने सर्वांची धावाधाव झाली.त्यातच‌ सांगली बाजार समिती निवडणूकीची रणधुमाळी सुरू असतानाचं त्यांची जतेत एंट्री झाल्याने तर्कवितर्क सुरू झाले होते.मात्र कर्नाटकातील सीमावर्ती भागात प्रचार सभा आटपून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाहनाने जतेत आले.जत येथील राजावाडा जवळील हेलपँडवरून थेट मुंबईकडे रवाना झाले.

Rate Card

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.