कुणीकोणूर खूनप्रकरणी संशयितास ३ दिवसाची पोलीस कोठडी

0
संख : कुणीकोणुर(ता.जत)येथील बेळुंखी वस्तीवर अनैतिक संबंधाच्या संशियातून मायलेकीचा दोरीने गळा दाबून खून करण्यात आला.आई प्रियंका बिराप्पा बेंळुखी (वय-३२) व मुलगी मोहिनी बिराप्पा बेंळुखी (वय-१४) असे मयत मायलेकीचे नांव आहे.याप्रकरणी संशयित आरोपी बिराप्पा बेळुंखीला ताब्यात घेण्यात आले होते.आज ता.२५ रोजी जत न्यायालयात हजर करण्यात आले,असता त्याला ३ दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.

 नगरसेवक विजय ताड यांच्या खूनातील संशयितांना मोका

कुणीकोणूर-सनमडी रस्त्यालगत बेळंखी वस्तीवर पति बिराप्पा कुटुंबासह राहत होते.गेले चौदा वर्षांपूर्वी लग्न झाले आहे.पत्नी प्रियंका,मुलगी मोहिनी,अन्य दोन मुले आहेत.बिराप्पाला बायकोचे बाहेर अनैतिक संबंध आहेत.असा संशय होता.यावरुन पति पत्नी वारंवार खटके उडत होते.

 पुढच्या ३ वर्षात एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही |- जयंत पाटील | वसंतदादा शेतकरी विकास पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन

रविवारी रात्री झोपडीत पति पत्नी मध्ये कडाक्याचे भांडण झाले.आवाज ऐकून मोठी मुलगी मोहिनी आवाज ऐकून आली. पत्नी प्रियंकाला खाली पडून दोरीने गळा आवळताना मुलीने सोडविण्याचा प्रयत्न केला.तिला ढकलून जोराने गळा आवळल्याने जागीच तिचा मृत्यू झाला.त्यानंतर मुलगीने ही घटना पाहिल्यामुळे तिची बाहेर वाचता करेल. या भितीने मुलगी मोहिनी हिचा गळा आवळून तिचा खून केला.अधिक तपास उमदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार करीत आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना,वाचा कसे आहे योजनेचे स्वरूप, कसा होणार लाभ

Rate Card

बाजार समितीत परिवर्तन करा ; पालकमंत्री

दिग्विजय चव्हाण यांच्या रुपाने बाजारसमितीत डफळापूरच्या भूमिपुत्राचे संचालक पद निश्चित !

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.