महिलांनी अवैध दारूचे दुकानच फोडले

0

विटा : सांगली जिल्ह्यातील नागेवाडी (ता. खानापूर) येथे घडला. खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथे गुरुवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वारंवार मागणी करूनही दारूबंदी होत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलीस आणि उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांच्या साक्षीने अवैध दारूचे दुकानच फोडले. महिलांनी गावात खुलेआम अवैध दारूविक्री सुरू असल्याचे निदर्शनास आणून देत कायमची दारूबंदी करण्याची मागणी केली. वारंवार मागणी करूनही अवैध दारू विक्री बंद का होत नाही? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला.  जमलेल्या काही लोकांनी याबाबत मोबाईल वरून विटा पोलिसांना माहिती दिली. त्यावर विटा पोलिसांचे पथक नागेवाडीकडे रवाना झाले.याच दरम्यान, तालुक्यातील उत्पादन शुल्कचे अधिकाऱ्यांनाही कळवण्यात आले होते त्यांचे पथकही नागेवाडीत दाखल झाले.

 

संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करीत अवैध दारू विक्री तात्काळ बंद करा अशी मागणी करत अवैध दारू विक्री केंद्राकडे कूच केली. त्यांनी दारूचे दुकानच फोडले.विशेष म्हणजे यावेळी विटा पोलीस आणि उत्पादन शुल्कचे अधिकाऱ्यांनी अवैध दारू विक्री दुकानावर आणि दुकानदारावर कारवाई करण्याचे सोडून त्याला संरक्षण देण्याचे काम केले. त्यामुळे जमाव आणखीनच चिडला, परिणामी काही काळ वातावरण तंग बनले. दुकानातील शेकडो बाटल्या ग्रामस्थांनी स्वतः रस्त्यावर टाकायला सुरुवात करताच पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत दारूसाठा जप्त केला. यापुढे गावात दारूबंदी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यानी इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

 

Rate Card

दरम्यान, विटा पोलिसांनी केलेल्या जप्तीच्या कारवाईत एकूण १४ हजार ५९० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये देशी दारूच्या बाटल्या, बिअर, स्कॉच व्हिस्की अशा दारूच्या बाटल्यांचा समावेश आहे. या शिवाय पहिल्या धारेची गावठी दारूचा साठा देखील या ठिकाणी मिळून आल्याचे पोलिस नाईक प्रशांत चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी संबंधित दारू विक्रेता सोमनाथ धोंडीराम घाडगे रा. विटा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.