इंस्टाग्राम या सोशल मीडियावरच्या माध्यमावर मुलांशी मैत्रीतून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

0

सातत्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.आताही एक धक्कादयक घटना समोर आली असून इंस्टाग्राम या सोशल मीडियावरच्या माध्यमावर मुलांशी मैत्रीतून कल्याणमध्ये राहणाऱ्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर चार मुलांनी सामूहिक बलात्कार केला आहे.

पुनवतमध्ये बारावीच्या विद्यार्थिनीची गळपासाने आत्महत्या

या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तातडीने चार संशयित मुलांना ताब्यात घेतलं आहे.यापैकी एकजण अल्पवयीन असल्याचीही माहिती समोर आली आहे.साहिल राजभर, सुजल गवळी आणि विजय बेरा अशी आरोपींची नावं आहेत. चौथा आरोपी अल्पवयीन आहे.

शोले स्टाईल आंदोलन महागात,पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Rate Card

सोशल मिडियावरील मैत्री अल्पवयीन मुलीला भोवलं आहे.एका १५ वर्षीय मुलीची इंस्टाग्रामवर काही तरुणांशी ओळख झाली. यापैकी एका तरुणाने या अल्पवयीन मुलीला माझं प्रेयसीसोबत भांडण झालं आहे असं सांगून भेटायला बोलावलं. त्यानंतर तिला रुमवर घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला, तसंच दुसऱ्या दिवशीही तिला बोलवून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर आणखी तीन जणांनी या मुलीवर अत्याचार केला. पीडित मुलीच्या घरातल्यांनी मुलगी हरवल्याची तक्रार केली होती. पोलीस त्या अनुषंगाने तपास करत होते.

जतच्या कुणीकोणुरमध्ये मायलेकीचा गळा आवळून खून 

त्यांनी या पीडित मुलीची सुटका केली. या प्रकरणात पोलिसांना चार जणांना ताब्यात घेतलं आहे. साहिल राजभर, सुजल गवळी आणि विजय बेरा अशी आरोपींची नावं आहेत. चौथा आरोपी अल्पवयीन आहे.संशयित ३ तिघांची पोलिस कोठडी सुनावली आहे.अल्पवयीन मुलाची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.