सांगली : सांगली बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा उभारला आहे.आज झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीच्या १८ पैकी 17 उमेदवारांचा विजय झाला, तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवारांचा विजय झाला आहे.
कुपवाडचा तलाठी लाच घेताना जाळ्यात
भाजपच्या पॅनेलला मोठा पराभव झाला आहे.आमदार जयंत पाटील,आमदार
विश्वजीत कदम,आमदार विक्रम सावंत यांची सरशी तर पालकमंत्री सरेश खाडे व खासदार संजयकाका पाटील,माजी आमदार विलासराव जगताप यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
महिलांनी अवैध दारूचे दुकानच फोडले
दरम्यान इस्लामपूर बाजार समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा 18 जागांपैकी 17 जागांवर विजय, हमाल गटात विरोधी उमेदवाराचा विजय झाला आहे.
सांगली बाजार समितीचे विजयी उमेदवार
सोसायटी गट सर्वसाधारण सुजय शिंदे, स्वप्निल शिंदे (जत), बापूसाहेब बुरसे, संग्राम पाटील, बाबगोंडा पाटील (मिरज), महेश पवार, रामचंद्र पाटील (कवठेमहांकाळ), महिला गट – शकुंतला बिराजदार (जत), कुसुम कोळेकर (कवठेमहांकाळ), ओबीसी – बाबासाहेब माळी (जत), भटक्या विमुक्त जाती जमाती- बिराप्पा शिंदे (जत), ग्रामपंचायत गट : आनंदराव नलवडे (मिरज), रावसाहेब पाटील (कवठेमहांकाळ) अनु. जाती- शशिकांत नागे (सांगली), आर्थिक दुर्बल गट रमेश पाटील (जत), हमाल-तोलाईदार : मारुती बंडगर, व्यापार गट : प्रशांत पाटील-मजलेकर (चेंबर ऑफ कॉमर्स), वारद कडाप्पा (अपक्ष).
पराभव मान्य पण: महाविकास आघाडीकडून वारेमाप पैसाचा वापर
सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलचा झालेला पराभव मान्य आहे. या पराभवाचे आत्मपरीक्षण केले जाणार आहे .परंतु सदरची लढाई धनशक्तीने जिंकली आहे. वारेमाप प्रमाणात पैशाचा वापर करण्यात आला. आमचे पॅनेल कमी कालावधीत तयार करण्यात आले होते. भविष्यात ही शेतकऱ्यांच्या हिताशी आम्ही बांधील आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कायम संघर्ष करत राहू. सद्यस्थितीत जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे विविध घटकांचे चांगल्या पद्धतीने आम्ही प्रश्न सोडवत आहोत .यापुढे ही आमचे नेते जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील व ज्येष्ठ नेते, माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली नव्या उमेदीने व संघटनात्मक काम सुरूच राहील.
– प्रकाशराव जमदाडे
संचालक,सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड,सांगली
बातमी अपडेट होत आहे..