‘बाजार समितीत पराभव,कारण..’, प्रकाश जमदाडे स्पष्टचं बोलले..   

0
सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलचा झालेला पराभव मान्य आहे. या पराभवाचे आत्मपरीक्षण केले जाणार आहे.परंतु सदरची लढाई धनशक्तीने जिंकली आहे. वारेमाप प्रमाणात पैशाचा वापर करण्यात आला.आमचे पॅनेल कमी कालावधीत तयार करण्यात आले होते,अशी प्रतिक्रिया भाजपाच्या पँनेलचे नेते प्रकाश जमदाडे यांनी दिली आहे.
भविष्यात ही शेतकऱ्यांच्या हिताशी आम्ही बांधील आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कायम संघर्ष करत राहू. सद्यस्थितीत जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे विविध घटकांचे चांगल्या पद्धतीने आम्ही प्रश्न सोडवत आहोत.
Rate Card
यापुढे ही आमचे नेते जिल्ह्याचे खासदार संजयकाका पाटील व ज्येष्ठ नेते, माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली नव्या उमेदीने व संघटनात्मक काम सुरूच राहील.,असेही जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे म्हणालेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.