जतजवळ भिषण अपघात,पाच जण ठार,एक जखमी | गाणगापूर देवदर्शन करून परतत असताना घडली घटना

0
जत : जत -विजापूर ‌राष्ट्रीय महामार्गावर ट्रक व स्विप्ट गाडीच्या अपघातात बनाळी व जत येथील पाच जणाचा मृत्यू झाला आहे,तर १० वर्षाचा मुलगा सुदैवाने या अपघातात बचावला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.जतपासून काही अंतरावर असलेल्या अमृत्तवाडी फाट्यानजिक हा महामार्ग झाल्यापासून आतापर्यतचा सर्वात मोठा भिषण अपघात घडला आहे.

हेही ‌वाचा-छत्रपती संभाजी महाराज चौक ते पोलीस लाईन रस्त्याचे लवकरचं डांबरीकरण | दिड कोटीचा निधी मंजूर

नामदेव गुणाप्पा सावंत (वय ६५),पद्मिनी नामदेव सावंत (वय ६०),श्लोक आकाशदिप सावंत (वय ८),मुयरी आकाशदिप सावंत,(वय ३८,सर्व जण रा बनाळी,सध्या जत)दत्ता हरिबा चव्हाण (वय ४० रा.जत) हे पाचजण ठार ‌झाले आहेत,तर वरद सावंत (वय १०)हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
अधिक माहिती अशी,मुळ बनाळीचे असलेले सावंत कुंटुबिय सध्या जत येथे राहतात.

हेही वाचा-बुडणाऱ्या पुतणीला वाचवताना काकांसह दोघंही बुडाले; कवठेमहांकाळ तालुक्यातील घटना  

Rate Card
सुट्या असल्याने कुंटुबातील पाच जण स्विप्ट गाडीने गाणगापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते.ते आज पहाटे परत जतकडे येत असताना विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर अमृत्तवाडी फाट्यानजिक एका मालवाहतूक ट्रकने स्विप्टला धडक दिली.धडक इतकी भिषण होती की या अपघातात स्विप्ट गाडीतील पाच जणांचा जागीच मृत्यु झाला असून एक दहा वर्षाचा ‌मुलगा सुदैवाने या अपघातात बचावला असून तोही गंभीर जखमी झाला आहे.त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.जत येथे ट्रव्हल कंपनी चालवित असलेले आकाशदिप सावंत यांचे हे कुंटुबिय आहेत.अपघातानंतर दोघाना जखमी अवस्थेत उपचारार्थ नेहत असताना त्यांचा वाटेत मृत्यू झाला आहे.

हेही वाचा- सांगलीत पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप

दुर्देवाने मोठा आघात या घटनेने सावंत कुंटुबियावर झाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका डंपरलाही धडक दिली आहे.मात्र डंपरमध्ये कोणी नसल्याने जीवित हानी टळली आहे.अपघातस्थळी तातडीने जत पोलीसांनी पोहचत मृत्तदेह जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत.पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.