जत : जत-सातारा महामार्गावर पुन्हा शहरानजिकच्या स्मशानभूमीजवळील पुलावर मालवाहतूक टेम्पोवरील चालकांचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो थेट पुलावरील बाजूच्या पट्ट्यात घुसल्याने टेम्पोचे मोठे नुकसान झाले,सुर्देवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
मात्र चकाचक महामार्गावरील वाहतूक प्रश्न ऐरणीवर आला आहे.छोटे-मोठे अपघात नित्याचे झाले असून महामार्गावर नियमाची कडक अंमलबजावणी गरजेची बनली आहे.