जत:मधील महावितरण कार्यालय ते छत्रपती संभाजी महाराज चौक या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते संपन्न झाला.अनेक दिवसापासून रखडलेल्या या रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध झाला असून आम्ही सातत्याने त्यासाठी पाठपुरावा केला होता.हे काम त्वरित करण्याच्या सूचना संबधितांना दिल्या आहेत,असे यावेळी आ.सावंत यांनी सांगितले. हा रस्ता हा शहरातील मुख्य रस्ता आहे. या मार्गावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरु असते. त्यामुळे सदरच्या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली होती.
सदरचा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग होण्यासाठी पाठपुरावा करीत निधी मंजूर करून आणल्याने या रस्त्याचे काम वेगाने सुरु करण्यात यश आले आहे. रस्ता लवकरच सुस्थितीत व दर्जेदार होणार असल्याने वाहनधारकांना होणार त्रास नक्कीच कमी होणार आहे,असेही आ.सावंत म्हणाले.