हृदयस्पर्शी! मुख्याध्यापकांच्या बदलीनंतर विद्यार्थी,पालकही ढसाढसा रडले; सरांचेही डोळे पाणावले
जत तालुक्यातील पांडोझरी-बाबरवस्ती जिल्हा परिषद मराठी शाळेचे प्रयोगशील शिक्षक दिलीप वाघमारे यांची आंतरजिल्हा बदलीने विद्यार्थी,पालक भावूक झाले.त्यांच्याभोवती कडे करुन थांबविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.सर,तुम्ही जाऊ नका.म्हणून विणविण्या व आर्त साद घातली.शिक्षकाची श्रीमंती विद्यार्थ्यांच्या प्रेमवर, मायावर असते.घटनेने दिसून आले.
पूर्व भागातील पांडोझरी येथील बाबरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक द्विशिक्षिकी वस्ती शाळेत दिलीप वाघमारे हे जून २०११ साली नोकरीला आले.त्यावेळी एका खोलीत शेळ्या तर एका खोली शाळा भरत होती.ऊसतोडणी मजूर,शेतमजूर,मेंढपाळ पालकांची मुले आहेत.विद्यार्थी गळतीचे प्रमाण अधिक होते.सह-शालेय उपक्रम, पालक भेटी,शैक्षणिक उठाव
पालक संपर्क,शैक्षणिक जागृती केली.पटसंख्या वाढली.गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन शैक्षणिक दर्जा उंचावला.त्यांना या वर्षाचा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला




यावेळी आण्णासाहेब गडदे,मारुती गडदे,शालेय व्यवस्थापन उपाध्यक्ष दिपाली बाबर,मनोहर पवार, हणमंत गडदे, राजाराम गडदे, मलाप्पा कोरे, कविता कोरे,सविता मोटे,सुनिता गडदे,रियाज जमादार,उपसरपंच मल्लेशप्पा गडदे, शिक्षक संघटनेचे भारत क्षिरसागर ,मलाप्पा कोरे,तुकाराम कोरे,मारुती बाबर,,केरुबा गडदे, दत्तात्रय बाबर,निंगाप्पा वज्रशेट्टी, माजी विद्यार्थी,शिक्षक, समितीचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.आभार अनिल पवार यांनी मानले.
शिक्षणापलिकडे मी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पर्यावरण, व्यसनमुक्तीचे अनेक उपक्रम राबविले.मुलांची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेतली. मुलांना आपलेसे केले.ऋणानुबंध निर्माण झाला. शिक्षकापेक्षा मी त्यांचा मित्र, दादा आहे.– दिलीप वाघमारेमुख्याध्यापक,बाबरवस्ती