श्री.उमाजीराव सनमडीकर मेडीकल फौंडेशन जत संचलित सिध्दार्थ पब्लिक स्कूल जत या शाळेचा सी.बी.एस.ई बोर्डाकडून घोषित केलेल्या इयत्ता 10 वी चा निकाल जाहीर झाला. शाळेच्या निकालाच्या चौथ्या वर्षामध्ये एकूण 42 विद्यार्थी परीक्षेस बसले होते.त्यापैकी 38 विद्यार्थी चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले.
त्यात प्रथम अनुजा विठ्ठल मिसाळ (94 टक्के) द्वितीय गौरी मल्लिकार्जून मनगुंळी (93.40 टक्के) तृतीय प्रणाम धनाजी भोसले (93 टक्के) चतृर्थ गौरी सुनिल हुचनकट्टी (92.60टक्के) यांनी उज्वल यश संपादन केले आहे.उत्तीर्ण झालेल्या मुलांचे संस्थेचे चेअरमन डॉ.वैशालीताई सनमडीकर सचिव डॉ.कैलास सनमडीकर, व संचालक मंडळ यांनी कौतुक केले.
यशस्वी झालेल्या विद्यार्थ्याचे शाळेचे प्राचार्य डॉ.विल्सन थॉमस, मार्गदर्शक शिक्षक सौ.सरिता पंडीत, सौ.रंजना कांबळे, सौ.सविता पाटील,श्री.नागेश खजिरे, श्री.विश्वास भोसले, यांचे मार्गदर्शन लाभले.