लग्नावरून झालेल्या वादातून मुलाचा बापाने खून केल्याचा प्रकार तासगाव तालुक्यातील जरंडीतील मंडले वस्ती येथे गुलाब भगवान मंडले (वय ५२) याने स्वतःचाच मुलगा विशाल गुलाब मंडले (१८) याचा खून करून आत्महत्येचा बनाव रचल्याचा प्रकार समोर आला आहे.
९ मे रोजी खून करून मध्यरात्री अंत्यविधी उरखल्यानंतर तासगाव पोलिसांना यांची माहिती मिळताच पोलीसांनी शुक्रवारी रक्षाविसर्जनालाच जरंडीत जाऊन तपास करत या खुनाचा छडा लावला आहे. संशयितावर रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून, याबाबत विशालच्या आईने फिर्याद दिली आहे.
गुलाब मंडलेच्या मोठ्या मुलाचे दोन वर्षांपूर्वी ९ मे रोजी लग्न झाले. याच दिवशी धाकट्या मुलाने लग्नावरून वाद सुरू केल्यामुळे, बाप-लेकात झालेल्या भांडणात बापाने मुलाचा खून केला. खून झाल्यानंतर रक्षाविसर्जन होईपर्यंत विशालने आत्महत्या केली, अशीच माहिती गावात होती. मात्र पोलिसांनी गुलाबला ताब्यात घेतल्यानंतर या खुनाची खबर गावात पसरली.