जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी प्रचार केलेल्या या चार मतदारसंघात कॉग्रेस उमेदवारांचा विजय

0
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा हा विजय देशात लवकरच होणाऱ्या परिवर्तनाची नांदी स्पष्ट करणारा व संविधान विरोधी राज्यकर्त्यांना हद्दपार करणारा विजय आहे.भाजपाने देशातील जनतेचे हाल चालविले असून विकासापेक्षा धार्मिक मुद्दे पुढे आणले ‌जात आहे.त्या उलट कॉग्रेसने कायम विकासाचे राजकारण केले आहे. त्यामुळे कर्नाटकात चित्र बदलले असून महाराष्ट्रातही कॉग्रेसला यश मिळेल अशी प्रतिक्रिया जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिली आहे.
आमदार सावंत यांनी प्रचार केलेल्या कर्नाटकातील सीमावर्ती मतदार संघातील काँग्रेसचे माजी मंत्री एम.बी.पाटील, माजी मंत्री लक्ष्मण सवदी व विठ्ठल कटकदोंड व यशवंत पाटील हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.त्यांचे आ.सावंत यांनी अभिनंदन केले असून कर्नाटकचा हा विजय परिवर्तनांची नांदी असेल असेही आ.सावंत यांनी म्हटले आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.