प्राध्यापक पत्नीने आयुष्य संपविले,पतीचे अनैतिक संबध व्हॉट्सअप चँटमुळे कोर्टात उघड

0

छत्रपती संभाजीनगर शहरात एका उच्चशिक्षित महिलेने सासरच्यांकडून पैशांसाठी होत असलेला छळ व पतीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना न्यायालयात समोर आली आहे.वर्षा दीपक नागलोत (वय २९ वर्षे)असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून त्या शहरातील एका प्रसिध्द एमआयटी महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत.विशेष म्हणजे दिपकवर दोन स्वतंत्र दोन गुन्हे दाखल झाले आहे.त्याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली. प्रेयसीनेदेखील त्याच्या त्रासाविरोधात चिकलठाणा पोलिसांकडे तक्रार दाखल केली.त्याची देखील न्यायालयाने दखल घेतली.या दोन्ही घटनाचा विचार करून न्यायालयाने जामिन फेटाळला आहे.

या सततच्या त्रासाला कंटाळून प्रा.वर्षा दीपक नागलोत यांनी ३ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणात त्यांचा पती दीपक तेव्हापासून अटकेत आहे.त्याने न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, वर्षा यांच्या माहेरच्यांकडून घेतलेल्या पैशांचे पुरावे, विवाहबाह्य संबंध व त्या प्रेयसीला दिलेला छळाची गंभीर प्रकार प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने न्यायालयाने या गुन्ह्यात दोषारापपत्र दाखल होऊनही दीपकचा जामीन याचिका फेटाळून लावली आहे.विशेष म्हणजे प्रा.वर्षा यांनी आत्महत्या केली तेव्हा त्या ७ महिन्याच्या गर्भवती होत्या हेही न्यायालया समोर आणण्यात आले.घटनेनंतर पोलीसांनी प्रा.वर्षा नागलोत यांच्या आत्महत्येप्रकरणी पती दीपक नागलोत (वय ३२) सह सासरा राजाराम नागलोत (वय ६०), सासू देविका (वय ५५), नणंद वैशाली (वय २५, सर्व रा. गजानन कॉलनी,छत्रपती संभाजीनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.वर्षा यांच्या आत्महत्येच्या दिवशी दीपकला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली आहे.

 

Rate Card
प्रेमविवाह करूनही दीपक व त्याच्या वडिलांनी वर्षा यांच्या माहेरकडून सतत पैशांची मागणी करत लाखो रुपये घेतले. त्यानंतरही दीपकचे अन्य ठिकाणी विवाहबाह्य संबंध सुरू झाले होते.गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांनी तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. अटके झाल्यापासून तो जामिनासाठी प्रयत्न करत आहे. वर्षा यांच्या माहेरच्यांच्या कडून ॲड. प्रशांत नागरगोजे, विष्णू नरके यांनी बाजू मांडत दीपकच्या जामिनाला विरोध केला.

 

पैसे घेतल्याच्या पुराव्यांसह त्याच्या प्रेयसीसोबतचा संवादाचे सबळ पुरावेच ॲड. प्रशांत नागरगोजे यांनी न्यायालयाच्या समोर आणत त्याच्या कृत्याचा पाढाच वाचला. त्यानंतर सत्र न्यायाधीश न्या. वर्षा पारगावकर यांनी अर्जदारासारखी व्यक्ती समाजासाठी घातक आहे,अशी गंभीर टिप्पणी करत दीपकचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.आरोपी पक्ष माहेरच्यांकडून आरोपींच्या खात्यावर आलेले लाखो रुपये कशासाठी घेतले हे स्पष्ट करू शकला ‌नाही.त्यामुळे खात्यावरील हे पैसे हुंडा म्हणूनच न्यायालयाने ग्राह्य धरल्याचे ॲड. नागरगोजे यांनी सांगितले. आरोपींनी सातत्याने साक्षीदारांवर दबाव टाकला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.