जतच्या युवक राष्ट्रवादीच्या फलकावरील एक लाखाची चर्चा | फलक सोशल मिडियावर व्हायरल
जत शहरातील स्टँड परिसरात युवक राष्ट्रवादीच्या वतीने एक फलक लावण्यात आला आहे.त्यात जयंत पाटील यांच्यावरील ईडीच्या नोटीसीच्या निषेधार्थ
भाजप नेत्यांवर ईडी कारवाई दाखवा, एक लाख रुपये मिळवा असा मजकूर असल्याने चर्चेला उधान आले आहे.विशेष म्हणजे अनेक कार्यकर्त्यांच्या स्टेट्स वर हा फलक झळकत होता.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले आमदार जयंत पाटील यांना चार दिवसापुर्वी ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस दिली आहे.या चौकशीसाठी हजर राहण्यास आ.पाटील यांनी १० दिवसांची मुदत मागितली आहे.त्याअगोदरचं जत शहरात लावण्यात आलेल्या या डिजिटल फलकाची चर्चा राज्यभर सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे जत तालुक्यात माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना माननारा मोठा गट कार्यरत आहे.नुकतीच आ.पाटील यांना ईडीने नोटीस बजावली आहे.जतच्या युवक राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात आला आहे. शनिवारी (दि. १४) रात्री जतमध्ये बसस्थानकासमोर तसा डिजीटल फलक लावण्यात आला आहे.त्यावर भाजपाच्या नेत्यावर ईडीची कारवाई दाखवा,एक लाख मिळवा,जाहीर निषेध असा मजकूर असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने हा फलक लावण्यात आला आहे.
या फलकामुळे राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या स्टेट्सवही हा फलक दिसून येत होता.या फलकावर भाजपचे नेते अथवा कार्यकर्त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. फलकबाजीवर प्रतिक्रिया देण्यास टाळले होते.माजी मंत्री जयंत पाटील यांच्याप्रती तालुक्यातील कार्यकर्त्यांनी फेसबुक व्हाट्सअप स्टेटस वर असे फलक टाकत आपल्या भावना व्यक्त केल्या.
याबाबत मिमिक्री, विनोद सुद्धा सुरू झाले आहेत. ईडीची भीती प्रत्येक विरोधी बाकावरील नेत्यांना आहे मात्र भाजपला का नाही असा सवाल नेटकऱ्यानी केला आहे.सोशल मिडियावर हा फलक जोरदार व्हायरल झाला आहे.