गळ्यात बेदाणाहार घालून बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा | – महेश खराडे
सांगली : द्राक्ष व बेदाणा उत्पादक संकटात सापडला आहे त्यामुळे द्राक्ष उत्पादकाच्या न्याय मागण्यासाठी बुधवार दिनांक १७ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली
खराडे म्हणाले की, हा मोर्चा सकाळी दहा वाजता क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विश्रामबाग मधील पुतळ्या पासून प्रारंभ होणार आहे.यावेळी बेदान्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.मोर्चाला येताना प्रत्येक शेतकऱ्याने बेदाण्याचा हार गळ्यात घालून यायचे आहे.तसेच उन्हाळ्याचा तडाखा जास्त आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी टोपी घालून यावे.
सोबत पाण्याची बोट्टल ठेवावी राज्यात सांगली जिल्हा हा द्राक्ष व बेदाणा उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो.यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे ही प्रचंड नुकसान झाले चार किलोची पेटी ७० ते १०० रुपयांना विकली द्राक्षाला यंदा फारच कमी दर मिळाला.चिरमुरे १४० रुपये किलो आणि द्राक्षे २५ ते ३० रुपये किलो हे वास्तव आहे.द्राक्षाला दर नाही म्हणून अनेक शेतकऱ्यांनी बेदाणा तयार केला पण बेदाणा उत्पादन यंदा प्रचंड झाले आहे.दरवर्षी १८ ते २० हजार गाडी बेदाणा उत्पादन होते,पण चालू वर्षी ते ३० हजार गाडी पर्यंत गेले आहे.एक गाडी म्हणजे १० टन सुमारे तीन लाख टन उत्पादन झाले आहे.त्यामुळे मिरज आणि तासगाव तालुक्यातील सर्व कोल्ड स्टोरेज फुल्ल झाली आहेत.बेदाणा ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती आहे.त्यामुळे बेदाणे दर पडले आहेत.
त्यामुळेच या शेतकर्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे.कांदा उत्पादक शेतकऱ्यांस अनुदान देण्यात आले.त्याच धर्तीवर द्राक्ष व बेदाना उत्पादक शेतकर्यांना एक लाखाचे अनुदान द्यावे ही प्रमुख मागणी आहे.

द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक ग्रामीण भागात रोजगार पुरवितात,औषध विक्रेत्यांना मोठा व्यवसाय देतात.वाहन धारकांना ही व्यवसायाची संधि देतात अर्थातच द्राक्ष व बेदाणा निर्मिती हे सांगली जिल्ह्याच्या अर्थकारणाचा मुख्य स्त्रोत आहे द्राक्ष शेती टिकली पाहिजे वाढली पाहिजे.द्राक्ष उत्पादक शेतकरी टिकला पाहिजे अनेक शेतकरी कर्ज बाजारी पणामुळे आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यांना आधार देण्याची जबाबदारी सर्वाची आहे.म्हणून आंदोलनाच्या माध्यमातून हा प्रश्न ऐरणीवर आणणार आहे.
प्रमख मागण्या• द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला अकरी एक लाख अनुदान द्या.• बेदाणा उत्पादक शेतकऱ्याला प्रती टन एक लाख अनुदान द्या.• द्राक्ष आणि बेदाना खप कमी झाल्याने ही समस्या उद्भभवत आहे त्यामुळे द्राक्ष आणि बेदाणा खाणे कसे हितकारक आहे. याची ब्रँड हिरो घेवून पणन महामंडळाने टीवीवर जाहिरात सुरु करावी.• गंडा टाळण्यासाठी दलालांना पर वाना सक्तीचा करावा तसेच गंडा घालणाऱ्या ना अटक करण्यासाठी राज्य व्यापी पोलीस पथक तयार करावे त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी कायद्यात बदल करावा.• बेदाणा उधळण १०० टक्के बंद करावीबेदाणा बॉक्सचे निम्मे पैसे शेतकऱ्यांना द्यावेत.• बेदाणा पेमेंट २१ दिवसात द्यावे त्यानंतर दिल्यास २ टक्के व्याज शेतकऱ्यांना द्यावे.• कीटकनाशकाच्या किमती कमी कराव्यात त्यावरील जी एस टी कमी करावा.• शेतकऱ्यांना कमी दराने मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करावा बेदाणा पणन नियमनात आणावा.
आदीसह अन्य मागण्यासाठी सदर आंदोलन बुधवार दिनांक १७ मे रोजी सकाळी दहा वाजता सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार आहे.तरी द्राक्ष व बेदाणा उत्पादक.शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं राजकारण बाजूला ठेवून आपल्या हितासाठी या मोर्चात सहभागी व्हावे जेवढी संख्या जास्त तेवढा प्रश्न सुटण्यास मदत होईल.त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या संखेने उपस्थित राहावे असे आवाहन खराडे यांनी केले आहे.मोर्चा यशस्वी करण्यासाठी भरत चौगुले संजय खोलखुंबे, बाळासाहेब लिंबेकाई,सुरेश वासगडे,उमेश मुळे,भरत पाटील,रावसाहेब पाटील,सुधाकर पाटील,अभिजीत चौगुले, जयकुमार चौगुले,शिवाजी पाटील,सूरज पाटील,दामाजी दुबळ,राजेंद्र माने,अमित रावताळे,निशिकांत पोतदार,अनिल पाटील, चंदु पाटील, आशिष पाटील, बालासो खरमाटे,संदीप शिरोटे,अशोक खाडे,सतिश पाटील आदीसह अन्य प्रयत्न करत आहेत.