कॉग्रेसच्या माजी केंद्रीय राज्यमंञ्यांच्या जतेत भेटीगाटी | लग्नसराईच्या निमित्ताने पुन्हा सक्रिय

0
जत : कॉग्रेसचे नेते, माजी केंद्रीय राज्यमंत्री राहिलेले प्रतिक पाटील यांनी सोमवारी जत तालुक्यातील उमदी ‌येथील  सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेसचे नेते वहाब आप्पासो मुल्ला यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यास उपस्थिती लावली.
गेली काही दिवस पाटील हे सार्वजनिक कार्यक्रमात कमी प्रमाणात दिसत होते.त्यांच्यावतीने कॉग्रेसचे नेते विशाल पाटील यांची उपस्थिती सर्वत्र असायची.मात्र गेल्या काही दिवसात माजी खासदार प्रतिक पाटील यांनी सार्वजनिक कार्यक्रमासह,लग्नसोहळे, विविध समारंभांनाही उपस्थित राहत असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्यास वावगे वाटणार नाही.

 

सलग दोन टर्म कॉग्रेसचे प्रतिक पाटील हे खासदार होते.कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख आहे.आता पुन्हा ते सक्रीय झाले आहेत.

 

सोमवारी उमदीतील लग्न सोहळ्यास त्यांनी उपस्थित राहून उमदी व जत तालुक्यातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची भेट घेतली आणि चर्चा केली.डफळापूर पंचायत समितीचे सदस्य दिग्विजय चव्हाण, सह पुर्व भागातील अनेक जून्या कार्यकर्त्यांची त्यांनी भेट घेतली आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.