मिरजेजवळ भिषण अपघात,पाच जण जागीच ठार
मिरज : राधानगरी तालूक्यातील सातजण बोलेरो मधून सोलापूरच्या दिशेने जात असताना मिरजेजवळ कोल्हापूर – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बायपासवर जीप व विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरची भिषण धडक होऊन झालेल्या अपघातात ५ जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. राधानगरीजवळच्या सरवडे येथील राहणारे सर्व मृत आहेत. तर दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.पोलीसाकडून तपास सुरू झाला आहे.