गौतमी पाटील हिचा कार्यक्रम उधळून लावणार,या नेत्यांने दिला इशारा

0

तासगाव : महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील हिचा वायफळे (ता. तासगाव) येथे दि. 21 मे रोजी कार्यक्रम होत आहे. मात्र हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे प्रशांत सदामते यांनी दिला आहे. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांनी महाराष्ट्राची कायदा – सुव्यवस्था बिघडत आहे, असेही सदामते यांनी म्हटले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा युपी, बिहार होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

 

वायफळे येथे रविवारी 21 मे रोजी विठ्ठल घोडके यांच्या लग्नाच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. कार्यक्रमासाठी भले मोठे मैदान स्वच्छ केले जात आहे. पार्किंगसाठी स्वतंत्र जागा तयार केली जात आहे. लाखो रुपयांचा डॉल्बी ठरवण्यात आला आहे. बाऊन्सर, बॅरिकेट, बोकडांची जेवणावळी असा लाखोंचा खर्च करण्यात येणार आहे.

 

मात्र आता या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्यांकडून विरोध होऊ लागला आहे. स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे प्रशांत सदामते यांनी तर थेट हा कार्यक्रम आढळून लावण्याचा इशारा दिला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, गौतमी पाटील ही स्वयंघोषित लावणीसम्राज्ञी आहे. तिच्या कार्यक्रमाने अनेक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गौतमी पाटील ही राजकारण, समाजकारणाचा मुद्दा होऊ शकत नाही. तिच्या कार्यक्रमात अनुचित प्रकार घडत आहेत.

Rate Card

स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीने यापूर्वीही सांगली जिल्ह्यात गौतमी पाटील हिचा कार्यक्रम होऊ देणार नाही. ज्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातील तेथील कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र यात्रा – जत्रा, उरूस अशा निमित्ताने हे कार्यक्रम झाल्याने त्या ठिकाणी भावनिकतेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी आम्ही फारसा विरोध केला नव्हता. मात्र आता यापुढे जिल्ह्यात कुठेही गौतमी पाटील हिचा कार्यक्रम होऊ देणार नाही.

 

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गुन्हेगारी, व्यसनाधीनता वाढत आहे. लोक सोने गहाण ठेवून, प्रसंगी जमिनी विकून कार्यक्रम ठेवत आहेत. मुळात गौतमी पाटील ही लावणीसम्राज्ञी नाही. तिने कुठे लावणीचे धडे घेतले आहेत, याचे उत्तर द्यावे. ती जे नृत्य करते ते लावणीच्या कोणत्या प्रकारात बसते, असा सवालही सदामते यांनी व्यक्त केला आहे.

 

गौतमी पाटील हिने आजपर्यंत महिलांच्या किती प्रश्नांवर आवाज उठवला, महिलांचे किती प्रश्न सोडवले, याचाही विचार करायला हवा. तिच्या कार्यक्रमाने राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडत आहे. त्यामुळे यापुढील काळात राज्याचा यूपी, बिहार होऊ देणार नाही, वायफळेसह तिचे जिल्ह्यात जिथे – जिथे कार्यक्रम होतील तेथील कार्यक्रम आम्ही उधळून लावू. तासगाव पोलिसांनीही या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, असे आवाहन सदामते यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.