आता, २ हजारांची नोट होणार बंद..!

0
4

नवी दिल्ली :  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मोठी बातमी समोर आली असून अगोदरच्या नोटाबंदीनंतर चलनात आणलेली २००० रुपयांची नोट आता चलनातून बाद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. २ हजार रुपयांच्या नोटा जारी करणे थांबवा, असा सल्ला रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने इतर बँकांना दिला आहे.

त्याचबरोबर २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात येणार आहे.नागरिकांच्याकडे असलेल्या २ हजार रूपयाच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करता येतील, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. ग्राहकांना २ हजार रुपयांच्या नोटा देणं तातडीने थांबवा, असे आदेश रिझर्व्ह बँकेने देशभरातील बँकांना दिले आहेत. ‘क्लिन नोट पॉलिसी’च्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेने हा मोठा निर्णय घेतला असून दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई बंद करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

 

मात्र, घोषणा झाली म्हणून ग्रांहकांनी घाबरण्याचे कारण नाही,कारण २००० रुपयांची लगेचच बंद होणार नाही किंवा चलनातून बाद होणार नाही. मात्र इतर बँकांना २००० हजारांची नोट ग्राहकांना देऊ नका, अशी सूचना आरबीआयने केलेली आहे. या नोटा पुन्हा बँकेत जमा करण्यासाठी २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंतचा कालावधी असणार आहे.२३ मे २०२३ पासून तुम्ही बँकांमध्ये जाऊन २ हजारांच्या नोटा बदलून घेऊ शकता.

 

मात्र २० हजार रुपयांच्या नोटाच एकावेळी बदलून मिळणार आहेत,म्हणजे १० नोटाच तुम्हाला बँकातून बदलता येतील.२ हजार रुपयांची नोट आरबीआय कायदा 1934 च्या कलम 24 (1) अंतर्गत आणण्यात आली.  दुसऱ्या नोटा बाजारात पुरेशा प्रमाणात आल्यानंतर २००० रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा उद्देश फोल ठरला. त्यामुळे २०१८-२०१९ मध्ये २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती.

 

९ नोव्हेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आश्चर्याचा धक्का देत देशात नोटबंदीची घोषणा केली होती. याअंतर्गत १ हजार आणि ५०० रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर बाजारात पुन्हा ५०० रुपयाची नवी नोट आणण्यात आली, मात्र १ हजार रुपयांच्या जागी २ हजार रुपयांची नोट आणण्यात आली होती.दरम्यान लवकरच ही नोट चलनातून बाद केली जाईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. आता अखेर रिझर्व्ह बँकेने याबाबत निर्णय घेतला असून २ हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत नागरिकांना मुदत देण्यात आली आहे.आता पुन्हा एका गर्दीचा सामना ग्रांहकांना करावा लागणार आहे.

 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here