अंत्यविधीनंतर उरकून निघालेल्या जमावात ट्रक धुसला,दोन ठार, तिघे जखमी  

0
सोलापूरात एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. सासऱ्याच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या दोन सुनांचा माघारी येताना वाटेत ट्रकच्या धडकेने मृत्यू झाला आहे.गुरसाळे (ता. पंढरपूर) येथे घडली आहे. हिराबाई भारत गुटाळ (वय ३५) व मुक्ताबाई गोरख गुटाळ (वय ४०) असे अपघातात मरण पावलेल्या नावे असून शनिवारी हा अपघात झाला.

पुनर्वसन टाकळी – गुरसाळे (ता. पंढरपूर ) येथील गेनदेव मनोहर गुटाळ यांचे शुक्रवार, १९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता रोजी निधन झाले.त्यांचे

अंत्यविधी उरकून घरी परत निघालेल्या शोकाकूल महिलांच्या जमावात करकंबहून भरधाव वेगात निघालेला मालट्रक घुसला.

 

या अपघातात मयत गेनदेव गुटाळ यांच्या सून हिराबाई भारत गुटाळ (वय ३५) व मुक्ताबाई गोरख गुटाळ (वय ४०) या दोन सुनांचा मृत्यू झाला तर दत्तात्रय अजिनाथ सरडे, सुनीता महादेव गुटाळ, आनंदाबाई धनेश्वर साळुंखे (तिघेही रा. चिखलठाण, ता. करमाळा), सुधामती साहेबराव धुमाळ (रा. सिद्धेश्वर निंबवडी, ता. बारामती), अनिता उर्फ गीतांजली जयहिंद देवकर (रा. सुगाव भोसे, ता. पंढरपूर) हे जखमी झाले आहेत.अचानक घडलेल्या याघटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.