म्हैसाळ योजनेतून एकूंडी व वज्रवाडला पाणी सोडा | – शेतकऱ्यांनी दिले निवेदन

0
जत : म्हैसाळ योजनेतून एकूंडी व वज्रवाड या गावांना पाणी सोडवे,अशी मागणी  कार्यकारी अभियंता सचिन पवार यांची भेट शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने केली. तसेच मायथळ पासून माडग्याळ ओढ्यात पाणी सोडणेसाठी चर काढण्यात यावी,अशा मागणीचेही निवेदन देण्यात आले. त्याबाबत पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांचेशी चर्चा करून खा.संजयकाका पाटील यांचे माध्यमातून मंजूरी पत्र मिळाले आहे.

 

जिरग्याळ,एकुंडी मध्ये नुकसान भरपाईसाठी कालवा खुदाईचे काम शेतकऱ्यांनी थांबवले आहे.त्यासाठी निवासी जिल्हाधिकारी विजय पाटील व सचिन पवार यांना बैठक लावून मार्ग काढावा व शेतकऱ्यांना पाणी देण्या संदर्भात कारवाई करावी अशी सूचना यावेळी खा.पाटील यांनी केली. जिल्हा बुक संचालक प्रकाश जमदाडे, माजी जि.प.सदस्य सूर्यकांत मुठेकर यांनी ही विकास कामाचे निवेदन दिले.यावेळी रामण्णा जीवनावर,मोहन कुलकर्णी,चिदानंद चौगले,लिंबाजी माळी सावकार,प्रमोद सावंत, निगोंडा बिराजदार,इरगुंडा पाटील,चिंतामणी बिराजदार आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.