शॉर्टसर्किटने आग,तब्बल १२ कोटींचे साहित्य जळून खाक !
मोहोळ : सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोली औद्योगिक वसाहत येथील डी एन के फूड प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत वायरिंग मधून अचानक शॉर्टसर्किट झाल्याने ‘सी बॉक्स’ वर ठिणग्या पडून लागलेल्या भिषण आगीत कंपनीचे विविध साहित्य व कागदपत्रे जळून तब्बल 12 कोटी 52 हजाराचे नुकसान झाल्याची घटना घडली.
या घटनेची नोंद ता 23 रोजी मोहोळ पोलिसात झाली आहे.या भिषण आगीत कंपनीतील जवळपास सर्वच साहित्य भस्मसात झाल्याची माहिती मिळत आहे.तीव्र उन्हाने आग जास्त भडकल्याने मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
