वायफळेत डॉल्बीचे साहित्य जप्त

0

तासगाव पोलिसांची कारवाई : पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांचा इशारा फाट्यावर मारून सुरू होता डॉल्बी

तासगाव : तासगावचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी वायफळे (ता. तासगाव) येथे बैठक घेऊन डॉल्बी चालू देणार नाही, असा इशारा दिला होता. मात्र निंभोरे यांचा इशारा फाट्यावर मारून वायफळे येथे प्रचंड मोठ्या आवाजात डॉल्बी सुरू असतो. काल (सोमवारी) रात्रीही मराठी शाळा परिसरात मोठ्या आवाजात डॉल्बी सुरू होता. याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर तासगाव पोलिसांनी डॉल्बीचे साहित्य जप्त केले.

 

सोमवारी रात्री वायफळे येथे एकाच्या लग्नाची वरात होती. वरातीसाठी डॉल्बी सांगण्यात आला होता. वराच्या घराजवळ हा डॉल्बी मोठमोठ्या आवाजात सुरू होता. डॉल्बीच्या आवाजाचा त्रास नागरिकांना होत होता. ज्या भागात डॉल्बी सुरू होता त्या भागात अनेक वयोवृद्ध रुग्ण, गर्भवती तसेच बाळंतीण महिला आहेत. या सर्वांना डॉल्बीच्या आवाजाचा त्रास होत होता.

 

या डॉल्बीच्या आवाजाबाबत परिसरातील नागरिकांनी तक्रार केली. संबंधित डॉल्बीचालकाला कमी आवाजात डॉल्बी लावण्याची विनंती केली. मात्र डॉल्बीचालक कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी तासगाव पोलीस ठाण्यात फोन करून याबाबत तक्रार केली. पोलिसांनी तातडीने वायफळे येथे येऊन डॉल्बीचे साहित्य जप्त केले.

 

बाळंतीण महिलेने तक्रार करूनही डॉल्बीचा आवाज कमी केला नाही…!

वायफळे येथे सोमवारी रात्री ज्या भागात डॉल्बी सुरू होता तेथील नागरिकांनी डॉल्बीच्या आवाजाबाबत तक्रार केली. या भागात काही बाळंतीण महिला राहतात. यातील एक महिला तर महिनाभर अगोदर बाळंत झाली झाली. तिचे लहान बाळ खूप नाजूक आहे. त्यामुळे संबंधित बाळंतीण महिलेच्या वडिलांनी डॉल्बीचालकाला आवाज कमी करण्याची विनंती केली. मात्र त्याने अजिबात ऐकले नाही. डॉल्बीचालक आवाज कमी करत नसल्याने संबंधित बाळंतीण महिला व घरातील इतर लोकांना मळेभागातील घरात नेण्याचा निर्णय घेतला. याचवेळी संबंधित बाळंतीण महिलेने डॉल्बीचालकाला आवाज कमी करण्याची विनंती केले. मात्र डॉल्बीचालकाने तिचेही ऐकले नाही.

Rate Card

 

डॉल्बीचे साहित्य जप्त करून पोलीस ठाण्यात नेले : सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष मोरे यांची माहिती

वायफळे येथे मोठ्या आवाजात डॉल्बी सुरू असल्याबाबत पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्याकडे गावकऱ्यांनी तक्रार केली होती. त्यानंतर निंभोरे यांनी संबंधित डॉल्बीचालकावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार वायफळे येथे जाऊन या डॉल्बीचे साहित्य जप्त केले. हे साहित्य पोलीस ठाण्यात आणून टाकले आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष मोरे यांनी दिली.

 

पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांना डॉल्बीचालक हिंगलत नाहीत?

काही महिन्यांपूर्वी तासगावचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी वायफळे येथील ग्रामपंचायतीत बैठक घेऊन तालुक्यात डॉल्बी चालू देणार नाही, असा इशारा दिला होता. मात्र निंभोरे यांचा इशारा पायदळी तुडवून तालुक्यातील गल्ली बोळात डॉल्बीचा आवाज घुमत असतो. या डॉल्बीच्या आवाजावर तासगाव पोलिसांचे कसलेही नियंत्रण नाही. डॉल्बीच्या दणदणाटाला लोक वैतागले आहेत. मात्र पोलीस ऍक्शन मोडवर येत नसल्याचे चित्र आहे. तर वायफळेसह तालुक्यातील डॉल्बीचालक पोलीस निरीक्षक निंभोरे यांना हिंगलत नसल्याचे चित्र आहे. निंभोरे यांच्या नाकावर टिचून तालुक्यात डॉल्बी चालकांचा नंगानाच सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.