सांगली : जेवण करताना नवरा-बायकोत झालेल्या वादाचे पर्यावसन भयान घटनेत झाले असून मिरज तालुक्यातील एरंडोली येथे पत्नीने आपल्या पतीवर धारधार शस्त्राने वार करत खून केला आहे.मिरज तालुक्यातून खूनाची ही मन हेलावणारी दुसरी घटना समोर आली असून सकाळी बेडग येथे मुलाने वडिलावर ट्रँक्टर घालून केला आहे.दरम्यान एरंडोलीतील खुनाच्या घटनेनंतर संशयित पत्नी फरार झाली आहे.
मिरज तालुक्यातील एरंडोली येथील पारधी वस्तीवरील कुटुंबातील पती-पत्नीमध्ये सतत वादावादीचे प्रकार घडत होते.बुधवारी जेवन करत असताना पुन्हा भांडण झाले.वैतागलेल्या पत्नीने थेट पतीचा खूनच केल्याची घटना समोर आली आहे.सुभेदार आनंदराव काळे (वय ४५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.तर चांदणी सुभेदार काळे असे संशयित पत्नीचे नाव आहे.
बुधवारी मिरज तालुक्यात सकाळी जमिनीचा वाद,मुलगा बापाच्या जीवावर उठला,त्याने थेट बापाला ट्रॅक्टरखाली चिरडून मारल,तर दुपारच्या सुमारास जेवण बनवताना दोघा पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून सुभेदार काळे हा पत्नी चांदणी हिच्या अंगावर धावून गेला.यावेळी पत्नीने धारदार शस्त्राने पती सुभेदार काळे याच्या अंगावर आणि छातीवर वार केले. यामध्ये गंभीर जखमी पती सुभेदार काळे याचा मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पारधी वस्तीवर खळबळ उडाली.या घटनेची मिरज ग्रामीण पोलिसांत नोंद झाली असून पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. घटनेनंतर पत्नी चांदणी काळे ही पसार झाली आहे.तिच्या शोधासाठी पथके पाठवण्यात आल्याचे पोलीसाकडून सांगण्यात आले.