सांगली बाजार समिती सभापतीपदीचा पहिला बहुमान जतला | सुजय शिंदे सभापती,उपसभापतीपदी रावसाहेब पाटील

0

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीचा पहिला मान जत‌ तालुक्याला मिळाला असून जत तालुका काँग्रेस पक्षाचे जतचे कार्याध्यक्ष,आमदार विक्रमसिंह सावंत यांचे समर्थक सुजय अशोकराव शिंदे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे.तर उपसभापतीपदी माजी मंत्री अजितराव घोरपडे समर्थक रावसाहेब राजाराम पाटील (कवठेमहांकाळ) यांची बिनविरोध निवड झाली.

जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.निवडीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सुरवसे यांनी नूतन पदाधिकार्यांचा सत्कार केला.
निवडीनंतर काँग्रेस समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.

नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व घोरपडे यांच्या महाआघाडीने भाजपचा पराभव करीत सत्ता मिळविली होती.या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. गुरुवारी सकाळी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.सावंत, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, राष्ट्रवादीचे जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांच्यात बैठक झाली. बैठकीत जत तालुक्याला पहिल्यांदा सभापतीपद द्यायचे निश्चित झाले.

Rate Card
जतचे सुजय शिंदे यांचा एकमेव अर्ज सभापदी पदासाठी दाखल होता.अर्जाला शशिकांत नागे सूचक व बाबगोंडा पाटील यांनी अनुमोदक होते.तर उपसभापती पदासाठी कवटेमहाकांळचे रावसाहेब पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जाला शकुंतला बिराजदार या सूचक राहिल्या,तर बिराप्पा शिंदे हे अनुमोदक आहेत.सत्ताधारी गटाचे नेते आमदार विक्रमसिंह सावंत, माजी मंत्री अजितराव घोरपडे, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.

 

यावेळी नूतन संचालक संग्राम पाटील, आनंदराव नलवडे, रमेश पाटील, बापूसो बुरसे, स्वप्नील शिंदे, बाबासाहेब माळी, महेश पवार, रामचंद्र पाटील, कुसुम कोळेकर, सचिव महेश चव्हाण उपस्थित होते.दरम्यान या निवडी १ वर्षासाठी असतील असे आ.सावंत यांनी सांगितले.

आ.सावंत यांचे एकनिष्ट समर्थक सुजय शिंदे यांना संधी

जत कॉग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत यांचे सुजय शिंदे हे निकटचे समर्थक आहेत.त्यांना बाजार समिती सभापती संधी मिळाली आहे.विशेष म्हणजे सुजय शिंदे हे जिल्हा बँक संचालक पदासाठीही इच्छूक होते.मात्र त्यांना संधी मिळाली नव्हती.मात्र बाजार समिती निवडणूकीत त्यांना उमेदवारी मिळाली ते विजयी झाले.व आता थेट सभापतीही झाल्याने त्यांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.