बसर्गी येथील बामणे दांपत्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तुंग यश

0

गुगवाड : महाराष्ट्र लोकसेवा आयगातर्फे राजपत्रित अधिकारी दर्ज्याच्या विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेची निवड यादी दिनांक २४ मे रोजी आयोगातर्फे जाहीर करण्यात आली. सदर यादीमध्ये बसर्गी चे सुपुत्र श्री नागेश बामणे यांची कक्ष अधिकारी मंत्रालय राजपत्रित दर्जा या पदी तर त्यांची पत्नी सौ.आद्विता शिंदे यांची पोलीस उप अधिक्षक या पदी निवड झाली आहे. सध्या नागेश बामणे हे बीएसएनएल मध्ये पुणे येथे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत तर त्यांच्या पत्नी सौ. आद्विता शिंदे या प्रशिक्षणार्थी सहाय्यक निबंधक म्हणून नाशिक येथे कार्यरत आहेत. दोघांनीही यापूर्वीही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले आहे.

 

हि त्यांची दुसऱ्यांदा उच्चपदी निवड होत आहे त्यामुळे संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नागेश बामणे यांच्या घरी ते दोघे पती पत्नी, ३ वर्षाची मुलगी आणि त्यांच्या आई असा परिवार आहे, श्री बामणे यांचा जीवनप्रवास खूप प्रेरणादायी आहे . ते अवघ्या ९ वर्षाचे असताना वडिलांचे निधन झाले त्यांनतर त्यांच्या आईने त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन देऊन अभियांत्रिकीचे शिक्षण दिले श्री बामणे हे आधीपासूनच खूप हुशार बुद्धिमत्ता असलेलं व्यक्तिमत्त्व आहे.

Rate Card

त्यांनी आपल्या आईच्या कष्टाचे चीज करून दाखवले आहे. सोबतच त्यांच्या पत्नी सौ अद्विता शिंदे ह्या पंढरपूर येथील एसटी वाहक मोहन शिंदे यांची कन्या आहेत त्या सुद्धा अभियांत्रिकी पदवीधर आहेत, लग्नानंतर संसाराची जबाबदारी सांभाळत UPSC-MPSC च्या परीक्षा दिल्या आहेत आणि यश मिळविलेले आहे यामध्ये त्यांच्या सासू मंगल बामणे यांचे खूप मोठे योगदान आणि त्यांचा पाठिंबा आहे आणि दोघांनीही हे यश लग्नानंतर मिळवले आहे आणि त्यांनी आपल्या या यशाचे श्रेय आपल्या आईला दिले आहे कारण ते दोघे परीक्षेची तयारी करत असताना त्यांच्या बाळाची आणि घरची जबाबदारी सांभाळून दोघांना पाठिंबा दिला.

 

नागेश बामणे हे तर आपली नोकरी आणि सांसारिक जबाबदारी सांभाळून हे यश मिळवले आहे त्यामुळे त्यांचे अजून जास्त कौतुक आहे . एकूणच त्यांच्या या यशाने त्यांनी आपल्या गावाचे आणि तालुक्याचे नाव रोशन केले आहे आणि तालुक्याचा शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे…

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.