स्वाभिमानीचा चड्डी मोर्चा ८ जूनला निघणार – महेश खराडे

0
94
सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणी ची बैठक सोमवार दि. ५ जून रोजी असल्याने पालकमंत्र्यांच्या घरावर काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला असून आता गुरुवार दिनांक 8 जून रोजी पालकमंत्री यांच्या घरावर चड्डी मोर्चा व बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी चे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.

 

खराडे म्हणाले 8 जून रोजी सकाळी दहा वाजता क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा विश्राम बाग चौक सांगली येथे जमायचे आहे तेथून पालकमंत्री यांच्या 100 फुटी  रस्त्यावरील बंगल्यावर हा मोर्चा जाणार आहे.थोडी लढाई जिंकली अजून लढाई बाकी आहे असे सांगून खराडे म्हणाले,आता नाही तर कधीच नाही म्हणून द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनो उठा जागे व्हा संघर्षाचा धागा व्हा.अनुदान, विमा, जाहिरात, पोषण आहार, जी एस टी  यासाठी आता लढायच, संघर्ष करायचा आहे.

 

संकटाला शरण जावू नका लढण्यासाठी मैदानात या,लढलो तर जिंकणारच असा आशावाद व्यक्त करून खराडे म्हणाले कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ३०० रुपये अनुदान दिले त्याच धर्तीवर द्राक्षबागेला एकरी एक लाख रुपये तसेच बेदाण्याला प्रती टन एक लाख रुपये अनुदान द्या, औषधाच्या किमती कमी कराव्यात या मागण्यासाठी ,टनुकताच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.या मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हा उपनिबंधक मंगेश सूर्वसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीत उशिरा बेदाणा पेमेंट केल्यास २ टक्के व्याज देण्याचा निर्णय झाला.

 

५०० ग्रॅम पेक्षा जास्त तूट धरल्यास संबधित व्यापाऱ्याला पुढील तीन सौद्यात  भाग घेण्यास बंदी घालण्याचा निर्णय झाला, बेदाणा बॉक्स चे निम्मे पैसे देण्याचा निर्णय झाला मात्र त्याची अंमलबजावणी पंढरपूर, सोलापूर आणि विजापूर या ठिकाणी ही तसा निर्णय झाल्यानंतर अंमलबजवानी करण्याचे ठरले अन्यथा तासगाव आणि सांगलीत च लागू झाल्यास बॉक्सचे निम्मे पैसे खरेदीदार देणार आहेत.त्यामुळे ते अन्य बाजार पेठेत जातील त्यामुळे या बाजार पेठा धोक्यात येतील त्यामुळे सामुदायिक निर्णयानंतर अंमलबजावणी करण्याचे ठरले कोल्ड स्टोरेज भाड्याचा स्लॅब १५ दिवसाचा करण्याचा निर्णय झाला. दलालाना परवाना देण्यासंबधी समिती व कृषी विभागाच्या वतीने प्रयत्न करण्याचे ठरले.या सर्वाची अमल बजावणी होते की नाही, हे पाहण्यासाठी दर तीन महिन्यांनी बैठक घेण्याचा निर्णय झाला.थोडा प्रयत्न केला तर काही तरी पदरात पडले.

 

आता पुन्हा राज्य पातळीवरील प्रश्नासाठी लढायचे आहे.संघर्ष करायचा आहे संघर्ष केला तरच द्राक्ष शेती वाचेल अन्यथा ती चित्रात बघावी लागेल अशी भीती ही त्यांनी बोलून दाखविली 8 जून रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहनही खराडे यांनी केले आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here