लालपरीचे अमृतमहोत्सव वर्षी जत तालुक्यास मिनी बसस्थानक द्या | उत्पन्नाची हमी,तरीही जत आगारास सुविधेची कमी

0

सांगली जिल्ह्यातील जत बस आगारास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ दूजाभावाची वागणूक देत असल्याची भावना जत तालुक्यातील प्रवाशांची, अधिकारी कर्मचाऱ्यांची होत आहे. लालपरीच्या अमृतमहोत्सव वर्षात तरी जत आगाराचा दूजाभाव थांबवुन जत आगारास सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी केली.

 

सांगली जिल्ह्यातील जत बस आगाराचे उत्पन्न पुणे विभागात अव्वल असूनही जत आगाराकडे एकही बस सुस्थितीत नाही नवीन आलेल्या बसेस मधून थोड्या फार बसेस जत आगारात येतील अशी अपेक्षा होती पण आगारात नवीन एकही बस उपलब्ध करून देण्यात आली नाही त्यामूळे पुढील काळात जिल्हामध्ये येणाऱ्या बसेस बाबत जत आगाराचा प्राधान्याने विचार करून जास्तीत जास्त नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात.

 

जत सांगली मार्गावर नॉनस्टॉप गाडी पूर्वीप्रमाणेच नॉनस्टॉप ठेवाव्यात फक्त कागदोपत्री नॉनस्टॉप आणि प्रत्यक्षात ऑडणरी चालू आहे ते त्वरित थांबवावे.जत सांगली कुंभारी मार्गे दिवसातून किमान सकाळ दुपार संध्याकाळ अश्या किमान तीन फेऱ्या चालू कराव्यात.

 

ग्रामीण भागातील सर्व बसेसचे वेळापत्रक कोव्हिड पूर्वी प्रमाणे चालू कराव्यात.अनेक मुक्काम गाड्या बंद करण्यात आल्या आहेत त्या पूर्ववत सुरू कराव्यात.उदा. जत आदामापुर, जत गूळवंची सह अन्य बंद केलेल्या बसेस सुरू कराव्यात.

 

नवीन फेऱ्या सुरू कराव्यात
जत चिंचणी, जत अक्कलकोट, जत गाणगापूर, संध्याकाळी जत हैद्राबाद या बसेस सुरू कराव्यात.
पूर्वीप्रमाणे रात्रीची सांगली वरून जत पूर्ववत करावी. जेणेकरुन प्रवाशांची गैरसोय थांबेल आणि महामंडळाचा पण आर्थिक विकास होईल.

 

शाळा महाविद्यालय चालू झाल्यावर विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी त्यानुसार बसेसचे नवीन वेळापत्रक तयार करावे.वायफळ डिसकळ वरून कोळेकरवाडी (लोहगाव) मार्गे सांगोला गाडी सुरू करावी तेथील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

 

आगाराच्या कामकाजाच्या तुलनेत चालक वाहक यांची संख्या वाढवून मिळावी जेणेकरून तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय थांबेल आणि महामंडळ प्रशासनाला कामकाज करणे सोईचे होईल. राज्यातील इतर चालक वाहक हे 180 ते 200 किमी अंतर काम करतात पण जत आगार अपवाद असून 400,500,600 किमी अंतर काम करतात. सध्या कार्यरत असलेल्या चालक वाहक यांच्यावर शरारिक आणि मानसिक तणाव वाढला आहे त्याचा त्यांच्या शरीरावर परिणाम होत आहे याचाही गांभीर्याने विचार करावा. यामुळेच सहा महिन्यापूर्वी जत पुणे बसचा कुंभारीनजिक अपघात होऊन चालक श्री टेकम व वाहक श्री पांढरे गंभीर जखमी झाले आहेत अजूनही ते कोमात आहेत.

Rate Card

 

बस असेल तर मशीन नाही
बस सुस्थितीत असेल तर इटीआय (तिकीट)मशीन खराब असते त्यामूळे एकही बस वेळेवर बाहेर पडत नाहीत. त्यामुळे चालक वाहक यांना तारेवरची कसरत करत ड्युटी करावी लागते.आगाराच्या योग्य प्रमाणात सुस्थितीतील इटीआय (तिकीट) मशीन उपलब्ध करून देणे गरजेचं आहे.

 

वर्कशॉप मध्ये मागणीप्रमाणे मटेरियल उपलब्ध होत नाही त्यामुळे गाडी सुस्थितीत ठेवण वर्कशॉप कर्मचारी यांना अवघड झाले आहे मार्गस्थ बिघाड मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असते.

 

अमृतमहोत्सव वर्षाची जतला मिनी बसस्थानकाची भेट द्यावी

मिनी बसस्थानक गरजेचं खानापुर तालुक्यात ५२ गावे आणि कमी क्षेत्रफळ असुनही विटा येथे मुख्य बसस्थानक तर खानापुर येथे मिनी बसस्थानक आहे पण जत तालुक्यातील १२३ गावे असून मोठे क्षेत्रफळ असलेल्या जत तालुक्यातील संख किंव्हा उमदी येथे मिनी बसस्थानकाची मागणी करूनही राज्य परिवहन महामंडळ याबाबत उदासीन आहे पण जत तालुक्यामध्ये मिनी बसस्थानक झाल्यास तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामीण बसेस प्रवाशांच्या सोयीच्या होऊन महामंडळाचा आर्थिक फायदा होईल.

 

पुणे विभागातील इतर आगाराच्या तुलनेत जत आगाराचे उत्पन्न अव्वल असतानाही महामंडळ प्रशासन जत आगारावर अन्याय करीत असून अमृतमहोत्सवी वर्षात खास बाब म्हणून तो दूजाभाव थांबवून जत तालुक्यात एक मिनी बसस्थानक व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांच्याकडे युवा नेते विक्रम ढोणे यांनी केली असल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.