रामराव विद्यामंदिरचा ९६.६६ टक्के
जत : येथील मराठा मंदिर श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा, ऑनलाईन प्रणालीव्दारे जाहीर झालेला.एस.एस.सी.मार्च २०२३ चा इयत्ता दहावीचा निकाल ९६.६६ लागला.यात आर्या शिंदे हिला गणित विषयात शंभरपैकी शंभर गुण प्राप्त झाले. परीक्षेला एकूण २७० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.त्यापैकी २६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

नव्वद टक्केच्या वरिल विद्यार्थी २० इतके आहेत.विद्यालयात प्रथम तीन आलेले विद्यार्थी असे प्रथम जाधव श्रुती अर्जुन,द्वितीय महाजन ओमशंकर,तृत्तीय हंकारे सानिका किरण यांनी विशेष प्राविण्य मिळवत यश मिळविले.विद्यालयाचे प्राचार्य शिवाजी शिंदे,उपप्राचार्य हरीबा भुसनूर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.