दहावीनंतर पुढे काय..! पॉलिटेक्निक डिप्लोमा एक उत्तम करिअर संधी..

0
दहावीची परीक्षा २०२३  मध्ये  उत्तीर्ण झालेल्या  सर्व  विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.  दहावी नंतर काय हा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात निर्माण झाला असेल.  परंतु दहावीची परीक्षा देऊन विद्यार्थ्यांना प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे  “पॉलिटेक्निक डिप्लोमा” हा विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये उत्तम करिअर संधी मिळून देणारे महत्वाचे क्षेत्र आहे.  या क्षेत्रामध्ये विद्यार्थी आपला सर्वांगीण विकास करून एक सक्षम इंजिनिअर  निर्माण होतात.

पॉलिटेक्निक डिप्लोमा हा विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षण आहे.  हा एआयसीटीई म्हणजेच ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, (AICTE) द्वारे मान्यता प्राप्त डिप्लोमा आहे. या अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना संबंधित स्ट्रीम आणि विषयाचे व्यावहारिक पैलू आणि मूलभूत गोष्टी शिकवल्या जातात. पॉलिटेक्निक डिप्लोमा ही अशी टेक्निकल पदवी  मानली जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना  चांगल्या नोकऱ्या मिळू शकतात. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना केवळ नोकऱ्याच देत नाही,  तर इतर अनेक अभ्यासक्रमांसाठी ही मार्ग खुला होत असतो. पॉलिटेक्निक डिप्लोमा केल्यानंतर विद्यार्थी लेटरल एंट्री स्कीम अंतर्गत बी.टेक. किंवा बी.ई. उच्च शिक्षण घेऊ  शकतात. लेटरल एंट्री म्हणजे विद्यार्थी थेट या अभ्यासक्रमांच्या दुसऱ्या वर्षात किंवा तिसऱ्या सेमिस्टरमध्ये प्रवेश घेऊ शकतात. अनेक इंजिनीअरिंग महाविद्यालये लॅटरल एंट्रीसाठी प्रवेश परीक्षा ही घेत आहेत.

”संजय घोडावत  पॉलिटेक्निकने  अल्प कालावधीत एन.बी.ए. मानांकन मिळाले आहे. पॉलिटेक्निकने दर्जेदार शिक्षण, यशस्वी निकाल व प्लेसमेंट या त्रिसूत्रीतून  पालक व विद्यार्थी यांचा विश्वास सार्थ ठरविला आहे.  संजय घोडावत पॉलीटेक्निकला टुडे रिसर्च अँड रेटिंग्स, नवी दिल्ली  या संस्थेमार्फत ”बेस्ट अपकमिंग पॉलीटेक्निक इन महाराष्ट्र ”पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच  महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आयोजित उत्कृष्ट प्रयोगशाळा स्पर्धेत संजय घोडावत पॉलीटेक्नीक च्या इलेक्ट्रिकल मशीन लॅब ला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. मेकॅनिकल इंजिंनिरिंग, सिव्हिल इंजिंनिरिंग, इलेक्ट्रिकल इंजिंनिरिंग,कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिंनिरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन  इंजिंनिरिंग या शाखांमधून येथे शिक्षण उपलब्ध आहे. शासन नियमानुसार सर्व शिष्यवृत्या उपलब्ध असून तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापकांकडून उत्तम मार्गदर्शन दिले जाते. याचबरोबर विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आणि उद्योजकीय विकास शासकीय योजना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि माफक फी मध्ये बस व वसतिगृहाची सोय ही उपलब्ध आहे.

एखाद्या विद्यार्थ्याला आर्थिक समस्या भेडसावत असेल तर त्याला पॉलिटेक्निक डिप्लोमा केल्यानंतर थेट नोकरी मिळू शकते. पॉलिटेक्निक डिप्लोमा धारकांसाठी उत्कृष्ट संधी निर्माण होत आहेत. अनेक विभागांमध्ये त्यांना कनिष्ठ स्तरावरील पदे आणि तंत्रज्ञ स्तरावरील नोकऱ्या मिळण्यास प्रधान्य असते. खासगी क्षेत्र मध्ये सरकारी नोकऱ्यांप्रमाणेच खासगी क्षेत्रातील कंपन्याही पॉलिटेक्निक डिप्लोमाधारकांना नोकऱ्या उपलब्ध करून देत आहेत.  त्यांना विशेषतः उत्पादन, बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन डोमेनमध्ये नोकऱ्या मिळतात. पॉलिटेक्निक  डिप्लोमाधारकांना स्वतःचे  नवीन स्टार्टअप स्वयंरोजगार सुरू करण्याची उत्तम संधी आहे. पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटद्वारे दिले जाणारे सर्व डिप्लोमा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांची संबंधित विषयातील थेअरी  आणि प्रॅक्टिकलद्वारे पूर्ण तयारी करतात. त्यांना प्रत्येक बाबीची माहिती दिली जाते. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी स्वत:चा व्यवसाय, सरकारी किंवा निमसरकारी नोकरी करण्याच्या तयारीत असतात. म्हणून दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक डिप्लोमा एक उत्तम करिअर संधी उपलब्ध आहे.

प्राचार्य, विराट व्ही. गिरी संजय घोडावत  पॉलिटेक्निक, अतिग्रे.  

 
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.