कात्ययाणी ज्वेलर्स दरोड्यातील २ आरोपी अटकेत,अन्य ५ जणांचा शोध सुरू

0
5

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील बालिंगा येथे चित्रपटातील दृष्याप्रमाणे गोळीबार करत  ज्वेलर्सवर धाडसी दरोडा टाकणाऱ्या दोघांना संशयितांना अवघ्या ३६ तासात पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.दरोड्यातील अन्य ५ संशयितांचा शोध सुरू असून एकूण ७ जणांनी हा दरोडा टाकल्याचे तपासात समोर आले आहे.गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार कोल्हापुर जिल्ह्यातील कोपर्डे येथे राहणारा विशाल धनाजी वरेकर आणि कनेरकर नगर येथे राहणारा सोनार सतीश पोहाळकर या दोघा संशयितांच्या मुशक्या पोलीसांनी आवळत त्यांना जेरबंद केले आहे.तर अन्य ५ संशयितांच्या पथके रवाना झाली आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,कोल्हापूर शहरापासून केवळ सात किलोमीटरवर असलेल्या कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावरील बालिंगा (ता. करवीर) येथील अगदी मध्यवर्ती चौकातील कात्यायणी ज्वेलर्सवर गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास दुकानावर दरोडोखोरांच्य सराईत टोळीने हवेत गोळीबार करत भरदिवसा दरोडा घातला होता. अंदाधुंद गोळीबार करत दोन कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने,१ लाख ५० हजारांची रोकड अशी एकूण २ कोटी ६ लाख ८४ हजार ८५० रुपयाचा मुद्देमाल पळविला होता.संशयितांना पळून जाताना रस्त्यावर उभ्या असणाऱ्या नागरिकांच्या दिशेनेही गोळीबार केला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती.दरम्यान  पोलिसांनी गतीने तपासाची सूत्रे फिरवत अवघ्या दिड दिवसात दोन संशयितांना ताब्यात घेत २९ लाख ८८ हजार ७०० रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केला आहे.

 

ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींपैकी विशाल वरेकर हा यापूर्वीच जुना राजवाडा पोलीस ठाण्याकडील फसवणुकीचा गुन्ह्यामध्ये कळंबा जेलमध्ये शिक्षा भोगत होता.यावेळी एका परराज्यातील आरोपीबरोबर त्याची मैत्री झाली. दरम्यान सदर आरोपी हे मार्च २०२३ मध्ये जामिनवर सुटले होते.जेलबाहेर आल्यानंतरही ते एकमेकांच्या संपर्कात होते.मे २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात या गुन्ह्याचा कट रचला होता.त्याप्रमाणे परराज्यातून चार संशयित आरोपी हे विशाल वरेकर यांच्या घरी राहण्यास आले. विशाल वरेकर व सदर संशयित आरोपी तीन जून ते पाच जूनच्या दरम्यान ज्वेलर्सच्या दुकानाची रेकी करून दरोड्याची पूर्वतयारी केली.सतीश पोहाळकर याला कात्ययाणी ज्वेलर्स दुकानाची प्राथमिक माहिती होती.

 

त्यामुळे हव्यासापोटी त्याने सदर कटात सहभाग घेतला.सदर गुन्हाकरिता जुना राजवाडा व राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीतील दोन पल्सर मोटरसायकलची चोरी केली आणि कनेरकर नगर फुलेवाडी येथील त्याच्या घरी लपवून ठेवली.या घटनेनंतर तो आपल्या परराज्यातील संशयित आरोपींसोबत कात्रज पुणे येथे राहण्यास गेला. यानंतर गुरुवारी सदर संशयतांनी कात्ययाणी ज्वेलर्सवर दरोडा टाकत लूट केली.

 

या दरोड्यात वापरण्यात आलेले पिस्तूल परराज्यातील आरोपींनी आणल्याचे दोन्ही संशयितांनी सांगितले
यावेळी संशयित आरोपी सतीश पोहाळकर यांच्या मदतीने पळून  जाण्यासाठी स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक महाराष्ट्र ४३ डी ९२१० ही चार चाकी चार दिवसांकरिता भाड्याने घेतली होतीअसेही पोलीस तपासात पुढे आले आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here