संखजवळ भिषण अपघात,दोघे ठार

0
संख : (रियाज जमादार)
जत तालुक्यातील दरीबडची संख रस्त्यावर माळी वस्तीजवळ चारचाकी गाडी व दुचाकीच्या धडकेत दोघा तरुणांचा मृत्यू झाला.मयत सुभाष मानवर कांबळे (वय २२),अरविंद गोविंद कोरे (वय २४,रा खंडनाळ ता.जत) अशी नावे आहेत. ही घटना माळी वस्तीजवळ बुधवारी रात्री साडेआठ वाजता घडली.

 

पूर्व भागातील खंडनाळ येथील सुभाष मानवर कांबळे, अरविंद गोविंद कोरे हे दोघेजण संखला संध्याकाळी कामानिमित्त आले होते.हे दोघे मित्र पै-पाहुणे आहेत.मयत अरविंद कोरे हा दरीबडची रस्त्यावर खंडनाळ फाट्यावर लगत रहातो.त्याला सोडून मयत सुभाष कांबळे जाणार होता.सुभाष हा खंडनाळ गावात रहातो.दोघेही काम करुन दुचाकीने गावी जात होते.दुचाकी माळी वस्तीजवळ आल्यावर अज्ञात चारचाकी गाडीची समोरासमोर धडक झाली.धडकेत दोघेही उडून डांबरी वर पडले.डोक्याला मार लागला. रक्तश्राव मोठ्या प्रमाणात झाला.रस्त्यावर चढ आहे.

 

अपघाताची माहिती शेजारील ग्रामस्थांनी नातेवाईकांना दिली. मुलांना तातडीने संख प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले.परिस्थिती गंभीर असल्याने डॉ सुशांत बुरकुले यांनी जतला पाठविले.रुग्णालयात घेऊन जाताना वाटेत मृत्यू झाला.मयत सुभाष कांबळे,अरविंद कोरे दोघे ऊसतोडणी मजूर आहेत. मयत सुभाष याला पत्नी,दोन भाऊ,आई,दोन मुली आहेत. तर अरविंद यांच्या पश्चात पत्नी,भाऊ, बहिण आई,एक मुलगा,मुलगी असा परिवार आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.