सुसलाद येथे पतीने डोक्यात दगड घालून केला पत्नीचा खून

0

उमदी(संजय ऐदोळे) : जत तालुक्यातील सुसलाद येथे पतीनेच पत्नीच्या डोक्यात दगड घालून निर्गुणपणे खून केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली ललिता कलाप्पा कांबळे (वय वर्ष 25) असे मयत पत्नीचे नाव आहे.

 

अधिक माहिती अशी की, सुसलाद येथील आंबेडकर नगरमध्ये कल्लाप्पा कांबळे आपल्या पत्नी व मुला सहित राहतात कल्लाप्पा यास दारूचे व्यसन असल्याने मंगळवारी रात्री दारू पिऊन घरी आल्यानंतर पती-पत्नीमध्ये भांडण झाले. त्यानंतर दारूच्या नशेत असणारे कल्लाप्पा कांबळे यांनी पत्नीच्या डोक्यात दगड घातला यात पत्नी ललीता हीचा जागीच मृत्यू झाला. यानंतर याबाबतची माहिती उमदी पोलिसांना देण्यात आली.

 

Rate Card

उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पती कलाप्पा कांबळे यास उमदी पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.मयत ललिता कांबळे यास तीन मुले आहेत. या खून घटनेने सुसलाद परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.