बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश,लवकरच निर्णय |- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
3
सांगली : द्राक्ष बेदाण्यासह सर्व फळे  खाणे आरोग्याला कसे हितकारक आहे.हे सांगणारी जाहिरात टीव्हीवर सुरू करावी. बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्याबाबत लवकरच निर्णय घेवू,अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील बैठकीत दिली.
मुंबई येथील सह्याद्री गेस्ट हाऊस येथे गुरुवारी द्राक्ष बेदाणा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तसेच ऊस वाहतूक दाराच्या प्रश्नाबाबत बैठक झाली.या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री सुरेश खाडे कृषी मंत्री अब्दुल सत्तार माजी खासदार राजू शेट्टी,प्रा संदीप जगताप जिल्हाध्यक्ष महेश खराडे, प्रा जालिंदर पाटील सावकार मादनाईक यांच्यासह अर्थ खात्याचे सचिव नितीन करीर,पणन विभागाचे धपाटे,कृषी विभागाचे खतगावकर आदीसह सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी एक रक्कमी एफआरपीचा मुद्दा लावून धरला तसेच ऊस वाहतूक दाराच्या समस्या मांडून द्राक्ष बेदाणा उत्पादकाच्या समस्या ऐरणीवर आणल्या ताबडतोब ऊस उत्पादक,द्राक्ष उत्पादक आणि ऊस वाहतूक दाराणा न्याय देण्याची आग्रही मागणी केली.
जिल्हाध्यक्ष महेश खराडे,यांनी द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्या मांडल्या कोरोणा मुळे तीन वर्षे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले.यंदा द्राक्षाचे उत्पादन चांगले झाले, मात्र द्राक्ष कवडीमोल किमतीने विकावी लागली.द्राक्षाला दर नाही म्हणून बेदाणा केला मात्र चिरमुर्या पेक्षा बेदाणा स्वस्त झाला आहे.त्यामुळे कांदा उत्पादकाला जसे अनुदान दिले तसे द्राक्ष बेदाणा उत्पादकाला अनुदान द्यावे.द्राक्ष बेदाणा हे युनिक पीक आहे,ते टिकवणे राज्याच्या दृष्टीने हितावह आहे.सुमारे 25 हजार कोटीची उलाढाल होते.पाच हजार कोटींचे परकीय चलन मिळवून देते तसेच द्राक्ष बेदाण्याचा खप कमी झाल्याने सर्व समस्या तयार होत आहे.खप वाढविण्यासाठी द्राक्षे खाल्याने रक्ता भिसरण चांगले होते रक्तदाब नियत्रणात राहतो त्वचेला चकाकी येते,अशी महत्व सांगणारी जाहिरात नॅशनल मीडियावर सुरू करावी.
तेच धोरण आंबा पेरू चिक्कू सह सर्व फळासाठी घ्यावे.बेदाण्याचा शालेय पोशन आहारात समावेश करावा  सर्वकष पीक विमा योजना सुरू करावी गंडा घालणाऱ्या दलालाचा बंदोबस्त करण्यासाठी नोंदणी बंधनकारक करावीकरावी.जी एस टी कमी करावा बेदाणा नियमनात आणावा आदी मागण्या केल्या.द्राक्ष बेदाणा उत्पादकांच्या वास्तव समस्या मांडल्या जाहिरातीचा मुद्दा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मान्य करून याबाबतची कार्यवाही करण्याचे आदेश कृषी मंत्र्यांना दिले.बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्याबाबत सकारात्मकता दर्शविली मात्र रेसिडू य आणि अन्य बाबी तपासून निर्णय घेवू अशी ग्वाही दिली.अनुदान बाबत काय करता येईल याचा विचार करून निर्णय घेवू,असे सांगितले.अन्य प्रश्नाची साधक बाधक चर्चा झाली बैठकीला संजय खोलखुंबे भरत चौगुले सुरेश वसगडे उमेश मुळे बाळासाहेब लिंबेकाई प्रा.अजित हलीगळे,संदीप राजोबा,संजय बेले, भागवत जाधव उपस्थित होते.

 

तर पुन्हा रस्त्यावर,लवकरच बेदाणा परिषद
द्राक्ष बेदाणा उत्पादकांचे प्रश्न आम्ही राज्य पातळीवर नेण्यात यशस्वी ठरलो आहोत हा पहिला टप्पा आहे.जाहिरात करणे, पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करणे,याबाबतीत सकारात्मक दृष्टीकोन आहे.त्याची पूर्तता न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू पण अन्य मागण्यासाठी आमचा लढा सुरूच राहील तसेच लवकरच जिल्ह्यात बेदाणा परिषद घेणार असल्याचे खराडे यांनी सांगितले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here