बायकोचा खून करण्यासाठी पिस्तूल घेऊन चाललेल्या एकास अटक

0

सांगली : बायकोचा खून करण्यासाठी पिस्तूल घेऊन निघालेल्या कर्नाटकातील एका पतीस पोलीसांनी ताब्यात घेतले.संशयिताकडून एक गावठी पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले आहे.सचिन बाबासाहेब रायमाने (रा. चिक्कोडी,कर्नाटक) असे या संशयिताचे नाव आहे. बायकोचे अनैतिक संबंध असल्याचा संशय सचिन याला होता,त्यामुळे तो पत्नीचा खून करण्यासाठी मिरज येथून पिस्तूल घेवून निघाला होता.संशयितास महात्मा गांधी पोलिसांनी अटक केली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, संशयित रायमाणे हा चिकोडी कर्नाटक येथील रहिवाशी असून त्याच्या बायकोचे अनैतिक संबंध असल्याचे त्याला संशय होता.या कारणातून तो बायकोचा खून करायचा म्हणून कुपवाड येथून एक येथून एक पिस्टल आणि काडतूस खरेदी करून चिकोडीकडे निघाला होता.यांची माहिती महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे कर्मचारी लामदाडे यांना मिळाली होती.या आधारे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांच्या पथकाने मिरज रेल्वे स्टेशन समोरून त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्तूल आणि एक जीवंत काडतूस मिळून आले.

पोलीस ठाण्यात आणत त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आपल्या बायकोचा खून करण्यासाठीच हे पिस्तूल खरेदी केल्याची कबुली पोलीसांना दिली आहे.बायकोचे अनैतिक संबंध होते,त्यामुळे मी तिचा खून करून पोलिसात हजर होणार होतो असेही त्याने पोलीसांना सांगितले.

Rate Card

त्यानुसार रायमाने यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. संशयिताने हे पिस्तूल कुपवाड मधिल एका व्यक्तीकडून विकत घेतल्याचे सांगितले.त्यानुसार पोलीस त्याचा शोधत घेत आहेत.महात्मा गांधी पोलिसांच्या या कारवाईमुळे एका महिलेचा जीव वाचविण्यात यश आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.