सांगली पोलीसांचे २६ ठिकाणी कोंबिंन ऑपरेशन | ४६ जणावर कारवाई

0
2
सांगली : सांगली जिल्ह्यातील २५ पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी वस्तीच्या एकूण २६ ठिकाणी रात्री एकाच वेळी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले.पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली यांच्यासह जिल्ह्यातील २२ उपविभागीय पोलीस अधिकारी,पोलीस अधिकारी,१८५ पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला.
पोलीस अधीक्षक, डॉ. बसवराज तेली यांनी दिनांक १६ जून रोजी रात्री २३.०० वा. पासून ते ०५.०० वा पर्यन्त कोंबिंग ऑपरेशन राबवण्याबाबत सुचना दिल्या होत्या. तयाप्रमाणे जिल्हयातील २५ पोलीस ठाणेच्या हद्दीत गुन्हेगारी वस्तीच्या एकूण २६ ठिकाणी रात्री एकाच वेळी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
या कोबिंग ऑपरेशनमध्ये रेकॉर्ड वरील आरोपी चेक करणे, फरारी व पाहिजे असलेले आरोपी चेक करणे, वॉरंन्ट मधील आरोपी चेक करुन त्यांचेवर कारवाई करणे, तसेच आर्म अँक्ट, एनडीपीएस, तडीपार इसम, जेल रिलीज आरोपी, रेकॉर्ड वरील हिस्ट्रीशिटर यांना चेक करुन काही संशयित मिळुन आलेस त्यांचेवर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.सदर कोंबिंग ऑपरेशनमध्ये एकुण वॉरंन्ट बजावणी १४, आर्म अँक्ट प्रमाणे २ कारवाई, चोरीच्या उद्देशाने संशयितरित्या फिरत असताना मिळून आले.
दोन इसमांवर सीआरपीसी १२२ प्रमाणे कारवाई, तडीपार आदेशाचा भंग करुन हद्दीत मिळुन आलेने एका इसमावर,सीआरपीसी १४२ प्रमाणे एक कारवाई, रेकॉडवरील ४६ हिस्ट्रीशिटर व सराईत गुन्हेगार यांना चेक केले,वेळेपेक्षा जास्त वेळ आपल्या आस्थापना चालु ठेवलेल्या ४ व्यावसायिकावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३ (डब्ल्यु) (आर) प्रमाणे ४ कारवाई, अवैद्यरित्या दारु विक्री करणारे १ इसमांवर कारवाई, सीआरपीसी कलम ११० प्रमाणे ४ इसमांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी नाकाबंदी लावुन संशयित वाहने चेक करुन कारवाई करण्यात आली आहे.अशा प्रकारची कोंबिंग ऑपरेशन्स यापुढे वेळोवेळी व वेगवेगळ्या गुन्हेगार लपण्याच्या ठिकाणी राबविण्यात येणार आहेत.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here