जत : काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार श्री. उमाजीराव सनमडीकर (काका) यांच्या 85 व्या जयंतीनिमित्त कमल ऑर्थोपेडीक सेंटर, जत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले आहे.आमदार सनमडीकर यांनी जत सारख्या दुष्काळी तालुक्यामध्ये राजकीय,सामाजिक, वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठे मोलाचे योगदान दिले आहे.
त्यांच्या या कामाचा वारसा असाच पुढे चालू ठेवण्याचा संकल्प मनामध्ये ठेऊन त्यांचे चिरंजीव डॉ.कैलास सनमडीकर आणि सून डॉ.वैशाली सनमडीकर हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये जत तालुक्यातील गोर गरीब,गरजू रुग्णांची सेवा करती यावी यासाठी जतमध्ये ‘कमल ऑर्थोपेडीक सेंटर जत, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ‘सुरु केले आहे.आजपर्यन्त त्यांनी हजारो रुग्णांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करून जीवदान दिले आहे.
अशाचप्रकारे लोकांना या वैद्यकीय सेवाचा लाभ घेता यावा यासाठी गुरुवार दिनांक- 22 जून रोजी सकाळी 10 ते सायं.5 पर्यंत आमदार सनमडीकर(काका) यांच्या 85 व्या जयंतीनिमित्त 40 वर्षा पुढील सर्वासाठी ‘भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर’चे आयोजन केले आहे.यामध्ये मोफत ई.सी.जी.रक्तदाब(B. p), शुगर तपासणी तसेच डायलेंसिस मध्ये विशेष सवलत देण्यात येणार आहे.तरी जत परिसरातील सर्व गरजूनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.कैलास सनमडीकर यांनी केले आहे.