आदिवासी मुख्याध्यापकास जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण | डोंगरसोनी येथील प्रकार : तिघांविरोधात ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल : सहायक शिक्षक, लिपीकासह अल्पवयीन मुलाचा समावेश

0

तासगाव : दहावीच्या निकालानंतर गुणपत्रके आणि दाखले वाटप करण्यासाठी शाळेतील कपाटाची चावी मागणा-या डोंगरसोनी (ता. तासगाव) येथील इंद्रसिंग रेवा पावरा वय ४० सध्या रा. सावळज ता. तासगाव जि.सांगली, मुळ रा. मालकातर ता. शिरपूर जि. धुळे या आदिवासी शिक्षकास जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली आहे.

मुख्याध्यापकांच्या फिर्यादीनंतर तासगाव पोलिस ठाण्यामध्ये सहायक शिक्षक अरुण बबन नांगरे, लिपीक सुनिल आनंदराव झांबरे आणि एक अल्पवयीन तरुण (रा. डोंगरसोनी ता. तासगाव जि.सांगली) यांच्या विरोधामध्ये ॲट्राॅसटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्याध्यापक इंद्रसिंग रेवा पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, डोंगरसोनी हायस्कूल डोंगरसोनी येथे सन २००७ पासून सहाय्यक शिक्षक म्हणून नोकरी करत आहे. डोंगरसोनी हायस्कूल डोंगरसोनी येथे फेब्रुवारी २०२२ मध्ये मुख्याध्यापक पदावर माझी नियुक्ती झाली असून त्यास शिक्षण अधिकारी (माध्यमिक) यांची मान्यता आहे.

मुख्याध्यापक म्हणून शिक्षणाधिका-यांनी माझी नियुक्ती केली आहे. परंतू सेवाकनिष्ठ शिक्षक अरुण बबन नांगरे यांनी अजून मला मुख्याध्यापक चार्ज घेवून दिलेला नाही. ते स्वतःच मुख्याध्यापक म्हणून सह्या करतात.

Rate Card

१४ जून रोजी मी एस. एस. सी. बोर्ड कोल्हापूर येथे दहावीची गुणपत्रके घेवून आलो. गुणपत्रके माझ्या ताब्यात ठेवली. दि. १५ रोजी दुपारी साडेबाराचे दरम्यान शाळेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची गुणपत्रके व दाखले वाटपाचा क्रार्यक्रम होता. त्यावेळी मी ऑफिसमध्ये असताना लिपीक सुनिल आनंदराव झांबरे यांना दाखले व गुणपत्रके द्यावयाची असल्याने जनरल रजिस्टर आणि दाखले बूकची मागणी केली.

सुनिल झांबरे यांनी मला “तू आमच्या शाळेचा मुख्याध्यापकच नाहीस, मी तुला कोणतेही रजिस्टर देणार नाही ” असे म्हणून मला “ये आदिवाश्या तुझा काय संबंध नाही, तुला येथे रहायचे असेल तर शाळेत यायचे नाही, तुला बघून घेईन. आयुष्यातुन उठवतो” अशा म्हणून गलिच्छ भाषेत शिवीगाळी करु लागला. सुनिल झांबरे रजिस्टर देत नव्हता म्हणून मी त्यास कपाटाच्या किल्ल्या द्या, मी रजिस्टर काढून दाखले देतो असे म्हणालो.

त्यांनी मला ढकलून देऊन लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण केली. बाळकृष्ण वामन झांबरे ( प्रयोगशाळा परिचर ) आमचे भांडणे सोडविण्यास आले असता सुनिल झांबरे यांच्या भावाच्या अल्पवयीन मुलाने पाठीमागून येऊन माझा गळा धरून मला खाली पाडले. अरुण बबन नांगरे यांनी येऊन मला मारहाण केली. त्यावेळी विजय जाधव (पालक) यांनी येवून सदर भांडण सोडविले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.