कर्नाटकातून पुण्याकडे चालेला ५२ लाखाचा गुटखा जप्त | जतेत कारवाई,ट्रक पकडला

0
2
सांगली : कर्नाटकातून पुण्याकडे ट्रकमधून बेकायदेशीरपणे घेऊन चालेल्या ५२ लाखाचा गुटखा जत पोलीसांनी जप्त करत मोठी कारवाई केली.रविवार ता.१८ सायंकाळी विजापूरहून पुण्याच्या दिशेने एक संशयित ट्रक निघाला होता. पोलिसांनी पाठलाग करून ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल ५२ लाख वीस हजाराचा गुटखा आढळून आला.पोलिसांनी गुटखा जप्त करत ट्रक ताब्यात घेतला आहे.जत उपविभागीय पोलीस अधिकारी व जत पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.याप्रकरणी वाहन चालक सुभाष गोगावले (रा. पुणे) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रात्री उशिराने पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवारी सायंकाळी महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची विजापूर येथून वाहतूक होणार असल्याची माहिती डिवायएसपी सुनील साळुंखे यांना मिळाली होती.या माहितीनुसार रविवारी सायंकाळी जत शहरातील विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर सापळा लावून हा ट्रक पकडण्यात आला.
विजापूरकडून येत असलेला ट्रक क्रमांक ( एम एच ४३ वाय ७०१९) हा जत बसस्थानकाजवळ पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला.परंतु, तो न थांबता तसाच पुढे गेल्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून शेगाव चौकात तो ट्रक अडवून ताब्यात घेतला.तपासणीत ट्रकमध्ये गुटख्याने भरलेली ७० हून अधिक पोती मिळून आली आहेत.याची सध्याच्या बाजारभावाने ५२ लाख वीस हजार इतकी किंमत आहे.त्याचबरोबर गुटखा वाहतूक करत असलेला आठ लाख रुपये किंमतीचा ट्रक पोलीसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे व पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेश गायकवाड, पोलीस संभाजी करांडे, योगेश पाटोळे, एस. ए. वगरे, सचिन हाक्के, गणेश ओलेकर, शरद हिप्परकर, उत्तम काळेल, राजू माळी, संतोष खांडेकर आदींच्या पथकाने केली.हा गुटखा कुठे जात होता, कुठून खरेदी करण्यात आला,याचा तपास पोलीस करत आहेत.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here